वाशिम :-आपण ज्या ग्रहावर राहतो.तो पृथ्वी नावाचा ग्रह आज संकटात आहे.कारण आज पर्यावरणाचा समतोल संपूर्ण ढासळलेला आहे. दिवसागणीक तापमानात भरमसाठ वाढ होत आहे.वृक्षतोडीमुळे ढगफुटी, महापूर,विजा पडणे,दरड कोसळणे,चक्रीवादळे येणे.अशी अनेक संकटे येत आहेत.अनेक कारखाने,बेसुमार वाढलेली वाहने यामुळे हवा प्रदूषित होत आहे.प्लास्टिकच्या अनावश्यक वापरामुळे जीवसृष्टी धोक्यात आली आहे.तेव्हा आपण सर्वांनी यापुढे जागृत राहून पर्यावरणासाठी श्रद्धेने आणि समर्पित भावनेने झटू या! असे उदगार गो ग्रीनचे सदस्य परमेश्वर व्यवहारे यांनी काढले.ते यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयात आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक विजय भड तर प्रमुख अतिथी म्हणून गो ग्रीन फाउंडेशनचे संजूभाऊ रुईवाले,डॉ.पद्माकर मिसाळ डॉक्टर पद्माकर मिसाळ परमेश्वर व्यवहार आशुतोष जोहरापूरकर, गिरीशभाऊ मिश्रीकोटकर, पोलीस पाटील सुनील ठाकरे, सरपंच प्रतिनिधी परमेश्वर आमले यांची उपस्थिती होती.प्रथमतः संपूर्ण गावातून वृक्षदिंडी काढून त्यामध्ये विविध नारे देऊन वृक्षारोपण बाबत जनजागृती करण्यात आली.सर्व उपस्थित मान्यवरांचे वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले.यानंतर आयोजित कार्यक्रमांमध्ये फाउंडेशनचे सदस्य परमेश्वर व्यवहारे यांनी झाडाचे मानवी जीवनातील महत्त्व व भविष्यातील संकट याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.अध्यक्ष भाषनात मुख्याध्यापक विजय भड यांनी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून गो ग्रीन फाउंडेशनचे आभार मानले.कार्यक्रमाचे सुत्र संचालन राजेश शेंडेकर तर गोपाल काकड यांनी आभार मानले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच फाउंडेशनच्या सचिन ताथोड, प्रवीण जोशी,गिरीश जिचकार,महेंद्र धनस्कर,गजानन गुल्हाने उपस्थित होते.असे वृत्त संजय कडोळे यांनी प्राप्त माहिती नुसार कळविले.