महाराष्ट्रातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांमधील अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कित्येक दिवसाची मागणी होती की, त्यांना तात्काळ अनुदानाचा वाढीव टप्पा लागू करावा. अखेर काल दिनांक 10 ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये या सर्व कर्मचाऱ्यांना अनुदानाचा वाढीव टप्पा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिक्षक समन्वय संघाच्या वतीने मागील जवळपास 56 दिवसापासून आझाद मैदान मुंबई येथे अनुदानाचा वाढीव टप्पा मिळण्यासाठी हूंकार आंदोलन सुरू होते. त्यासोबतच अमरावती विभागाचे लोकप्रिय शिक्षक आमदार माननीय किरणरावजी सरनाईक साहेब हे मागील दोन महिन्यापासून अनुदान वाढिव टप्पा मागणीचा तीव्र पाठपुरावा करत आलेले होते. किरणरावजी सरनाईक यांनी मागील पावसाळी अधिवेशनामध्ये अनुदानाचा वाढीव टप्पा एक जानेवारी 2024 पासून देण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यानंतर ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजित दादापवार,तसेच शालेय शिक्षण मंत्री दिपकजी केसरकर साहेब यांच्या सतत संपर्कात होते व वेळ मिळेल त्यावेळी निवेदनाद्वारे अनुदान टप्पा वाढीचा निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा करत आलेले होते. अखेर या मागणीला यश आले असून अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांना अनुदानाचा वाढीव टप्पा लागू करण्यात आला आहे.
त्यासोबतच अघोषित शाळांना सुद्धा नवीन 20% अनुदान लागू करण्यात आले आहे. तसेच त्रुटी पूर्तता केल्या केलेल्या शाळांना अनुदानाचे टप्पे मिळणार आहेत. या निर्णया शिवाय डोंगरी भागातील विद्यार्थी संख्येची अट शिथिल करण्यात आलेली आहे. आणि सेवा उपदान यामध्ये 14 लाखावरून वीस लाखापर्यंत वाढ सुद्धा करण्यात आलेली आहे.
अनुदान टप्पा वाढीचा चा लाभ महाराष्ट्रातील जवळपास दहा हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शिक्षकांसाठी हा अत्यंत दिलासादायक निर्णय आहे. अमरावती विभागाचे लोकप्रिय शिक्षक आमदार मा. किरणरावजी सरनाईक यांनी मा. एकनाथ शिंदे साहेब, श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, श्री अजित दादा पवार साहेब, व शालेय शिक्षण मंत्री दिपकजी केसरकर साहेब, यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. त्यासोबतच शिक्षकांमधून किरणराव सरनाईक यांचे सुद्धा आभार मानले जात आहेत. अनुदान वाढीचा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करण्यासाठी किरणराव सरनाईक प्रयत्नशील आहेत.