चंद्रपूर-घुग्घुस मार्गावर सकाळी एसटी महामंडळाच्या चालत्या बसला अचानक आग लागली. बस चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी चंद्रपूर आगाराची बस घुग्घुसकडे जात होती. दरम्यान, बस घुग्घुस येथील खान ट्रेडर्सजवळ येताच बसमधून धूर निघू लागला. धूर निघताच बस चालक सावध झाला आणि त्याने बसमधील सर्व प्रवासींना बसमधून खाली उतरण्यास सांगितले. मात्र, बसमध्ये खूपच कमी प्रवासी होते. चालक व वाहकाने आसपासच्य लोकांच्या मदतीने बसवर पाण्याचा मारा करून आग विझवली. या अपघातात बसच्या पुढील भागा नुकसान झाले आहे.