वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे.) : जिल्हयात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत वृक्ष लागवडीची व जलसंधारणाची कामे मोठया प्रमाणात करतांना नाला खोलीकरणाच्या कामांना प्राधान्य द्यावे. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी दिले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जलशक्ती अभियान,जलयुक्त शिवार व वृक्ष लागवडीचा आढावा घेतांना श्री.षण्मुगराजन बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर, लक्ष्मण मापारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अरिफ शहा आणि जिल्हा भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक कडू यांची प्रमुख उपस्थिती होती