दिवसेंदिवस वाढत चाललेली देशाची बिकट अवस्था आणि त्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा, दिवसेंदिवस जनसामान्यात फोफावत आहे, कुठे मराठा आरक्षणाकरिता मराठा समाज एकत्र येतो तर कुठे बंजारा समाज आता यामध्ये आरक्षण कसे ?आणि कुठे द्यायचे ? त्यामुळे जुन्या पुराव्यानुसार प्रत्येकाने प्रत्येकाच्या हिस्सेदारी आरक्षणामध्ये आमचा हिस्सा टाकावा . आमचे हिस्सेदारी द्यावी या पद्धतीचे निवेदने आंदोलने चालू केलेली आहेत.
परंतु सरकार,ज्यांच्याकडे पहिलेच कमी आरक्षण मर्यादा आहे. त्यामधून प्रत्येकाला आरक्षणाचा हिस्सा तो कसा देईल बरं ? त्यासाठी आदिवासी बांधवा कडून भव्य मोर्चा काढण्यात आला.
निसर्गाची पूजा करणारा,दर्या खोऱ्यात राहणारा,डोंगराळ भागात जास्त वस्ती करून राहणारा, हजारो वर्षापासून अविकसित असलेला हा आदिवासी समाज, जो या देशाचा मूळनिवासी आहे. आज शिक्षणाानुसार आणि भारतीय संविधानानुसार विकसित होत आहे,तरीसुद्धा पूर्णपणे विकसित नाही. आज त्या मधले काही लोक जगायला शिकलेत आणि त्यांच्या जगण्यावर सुद्धा मनूवादी वृत्तीचा डोळा.जल, जमीन, जंगल यांच्याकडून हिसकावण्यात येत आहे आता हा नवीनच मुद्दा समोर आला आहे, त्यांच्या हिश्याचा आरक्षण सुद्धा हिसकावण्यात येत आहे ते वाचवण्याकरिता हा जनसमुदाय, त्यांची अस्तित्वाची लढाई, म्हणून हा समाज एकत्र आला, आणि जन आक्रोश मोर्चा निघाला त्याचे स्वरूप जन आंदोलनात झाले. हजारोच्या लोकसंख्येत महिला आणि पुरुष तरुण, तरुणी एकत्रित आले. आणि त्यांनी आदिवासीचे आरक्षण कुणाला देवू नये. यासाठी तहसिल कार्यालयावर हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत भव्य मोर्चा नेऊन त्यांचे मार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा आदिवासी मंत्र्यांना निवेदन दिले .असे वृत्त प्रत्यक्षदर्शी युवा पत्रकार विनोद गणवीर यांनी कळवीले