पुणे: सरदार वल्लभ भाई पटेल ज्येष्ठ राजनीतिज्ञ, मुत्सद्दी आणि पारंगत विधीतज्ञ होते. स्वातंत्र्यलढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताला घडवून देश एकसंघ ठेवण्याचे महान कार्य सरदार वल्लभाई पटेल यांनी केले. त्यांनी गांधीजींच्या प्रभावाखाली कार्य केले परंतू मास्टर राष्ट्रहितासाठी ते जहाल मतवादी होते. भारताची एकता व अखंडता टिकवण्यासाठी समर्पित भावनेने कार्य केल्यामुळे त्यांना लोहपुरुष सरदार ही पदवी प्राप्त झाली. या महान देशभक्तांच्या नावे दिल्या जाणारे भारतरत्नसरदार वल्लभ भाई पटेल पुरस्कार म्हणजे एक विभूती पूजा आहे. राष्ट्रासाठी कणखर नेतृत्व आणि निष्काम कर्मयोगी कार्य करणे व देशामध्ये नवचैतन्य निर्माण करणे म्हणजे सरदारांची जयंती केल्याची सार्थक होईल. भारताचे पंतप्रधान पूज्यनीय नरेंद्र मोदीजी हे सरदारांचे स्वप्न पूर्ण करण्याचे महान समर्पित कार्य करीत आहेत.असे विचार समाजसेवक प्रवचनकार डॉक्टर रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. राष्ट्रीय एकात्मता दिन व सरदार वल्लभाई पटेल जयंतीदिनी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याचवेळी राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे आयोजनही करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या आपल्या अध्यक्षिय भाषणातून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉक्टर रवींद्र भोळे हे बोलत होते. यावेळी पुढे बोलतांना त्यांनी भारताचे पंतप्रधान पूजनिय नरेद्र मोदी सुध्दा सरदार वल्लभभाई पटेलांचे स्वप्न पूर्ण करणारे महान कार्य सध्या करी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सामाजिक,वैद्यकीय,शैक्षणिक,आपत्ती काळातील मदती,आणि निराधार,अपंग सेवा क्षेत्रात गेला ३० ते ३५ वर्ष काम करणारे रविंन्द्र भोळे हे त्यांच्या संस्थेमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून हे पुरकार वितरणाचे कार्य करीत आहेत.त्यमुळे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अग्रेसर व्यक्तींना त्यांच्या कार्याच्या कक्षा वाढविण्यासाठी हे पुरस्कार एक प्रोत्साहनात्मक उर्जाशक्ती ठरत आहे.त्यामुळे आपल्या आपल्या वैद्यकीय आणि ईतर सेवाकार्यातील ते सातत्याने राबवत असलेल्या या उपक्रमाचे दरवर्षी कौतूक होत असून या उपक्रमामुळे त्यांचे महाराष्ट्रभरातून दरवर्षी अभिनंदन होत असते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह ,येरवडा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विद्याधर गायकवाड जीएसटी असिस्टंट कमिशनर पुणे , सतीश गवळी सेक्रेटरी विद्या प्रसारण मंडळ पुणे, चेतन सोनवणे, पोपटराव भोळे प्रदेशाध्यक्ष किसान मोर्चा राजेंद्र लंकेश्री जेष्ठ पत्रकार महासंघ अध्यक्ष मुंबई ,उपस्थित होते. या प्रसंगी राष्ट्रीय एकात्मता दिनाचे औचित्य साधत , सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त नीती आयोग भारत सरकार संलग्नित पद्मश्री डॉक्टर मनीभाई देसाई मानव सेवा ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्रभरातील विविध क्षेत्रातील जवळपास ८० पेक्षा अधिक अग्रेसर व्यक्तींना सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार प्रबोधनकार अपंग सेवक डॉ रविंद्र भोळे ह्यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन एल.डी.साळवे यांनी केले.