शहरात भव्य असा शिवाजी महाराजांचा चौक असावा असा संकल्प रेव्हन्यू कॉलनीतील युवकांनी केला होता. त्याच अनुषंगाने रेव्हन्यू कॉलनी, महिला महाविद्यालय हायवे रोडवर गडचिरोली मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे थाटात अनावरण करण्यात आले.
फलकाचे काम पूर्ण झाल्याने हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून फलकाचे अनावरण करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी, जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने शिवभक्तांमध्ये उत्साह संचारला होता. त्याच प्रमाणे नगर परिषद ला निवेदन देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा व सौंदर्यकरणासाठी निधी देण्यात यावा अशी मागणी सुद्धा केलेली आहे.यावेळी कुणाल पेंदोरकर, स्वप्नील अडेट्टीवार, निखिल चरडे,अमित तलांडी,अभि उमाटे, शरद गिरेपुंजे, किशोर भांडारकर, दिलीप अडेट्टीवार,प्रमोद बोरसरे, डॉ. आशिष भोयर, तेजस भांडारकर,पंकज भांडेकर, साई सीलमवार, प्रमोद बोधाने, राजू घुघरे, दूधराम रोहनकर, प्रेमानंद नंदेश्वर, शामराम सीलमवार, श्रीकांत कातरकर, माणिक केळझरकर, मयूर मशाखेत्री, चंदू श्रीकोंडवार, आशुतोष गोरले, महेश बुद्धावार,केतन कांकलवार, रणजित देशमुख, भागवत गिरीपुंजे, आशिष सोरते, चंदू ठलाल,दुर्योधन ठाकरे, दुधळकर महाराज, रवी धानोरकर, मंदिरकर साहेब, राजू जुमनाके, धकातें साहेब,
श्रीनिवास संगोजी, डॉ. हिवसे साहेब, शाहनवाज खान पठाण, गौरव निंबारते, अनुराग शिवरकर, कुनाल गोवर्धन उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....