वाशिम : वाढत्या प्रदुषणास आळा घालण्याकरीता जिल्हयातील सर्व दुचाकी, चारचाकी, हलके, मध्यम, अवजड मालवाहू, हलके, मध्यम, अवजड प्रवासी, ट्रॅक्टर या संवर्गातील वाहन मालकांनी त्यांच्याकडे असलेल्या वाहनांचे वायु प्रदुषण प्रमाणपत्र (पीयुसी) जर संपलेले असेल तर, तात्काळ जिल्हयातील कोणत्याही अधिकृत पीयुसी केंद्रावरुन वाहन 4.0 प्रणालीव्दारे काढून घ्यावे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाशिमच्या तपासणी पथकामार्फत वाहनाचे पीयुसी प्रमाणपत्र वैध नसल्याचे आढळून आल्यास, मोटार वाहन कायदयाअंतर्गत वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. याबाबत वाहनाची तपासणी मोहिम सुरु करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली.