कारंजा : स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा आणि सा.करंजमहात्म्य परिवाराच्या वतीने, सालाबादप्रमाणे यंदाही गांधी चौक येथील कार्यालयात, हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आदर्श जय भारत सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर गरड हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.संजय किटे,डॉ कलिम मिर्झा, डॉ.इम्तियाज लुलानिया,सोनार समाज संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते त्र्यंबकराव लोणकर,अ भा नाट्य परिषदेचे सदस्य नंदकिशोर कव्हळकर,विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे, सप्तखंजेरी प्रबोधनकार हभप गोपाल महाराज ठिलोरकर इ. होते.सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन व राजे शिवाजीमहाराज आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवाभावी सामाजिक कार्यकर्ते डॉ ज्ञानेश्वर गरड यांचा डॉ.संजय किटे यांचे हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला.तर आयोजक उमेश अनासाने यांचे हस्ते इतर मान्यवरांचे, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ.ज्ञानेश्वर गरड यांनी, रयतेचे राजे छ. शिवराय आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई यांच्या जीवनचरित्राची संपूर्ण माहिती देत,समाजाला संघटन व शिक्षणा बद्दल जागृत करण्याकरीता अशा कार्यक्रमाची आवश्यकता असल्याचे पटवून दिले.यावेळी कार्यक्रमाला रोहीत महाजन, गुलाब चव्हाण,अशोक गोरडे, अनिसभाई कुरेशी,माणिक महाराज हांडे,रोमिल लाठीया इत्यादींची उपस्थिती होती. कार्यक्रम प्रास्ताविक संजय कडोळे यांनी तर सुत्रसंचालन व समोरोपिय संभाषन आयोजक उमेश अनासाने यांनी केले.