कारंजा (लाड) : कुलगुरू कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालय नागपूर महाराष्ट्र द्वारा संचालित रवी कीर्ती संस्कृत अभ्यासिका सांगली,महाराष्ट्र अंतर्गत ज्ञानवर्धिनी संस्कृती शिकवणी वर्गा द्वारा वर्ग पाचवी ते दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता आयोजित स्पर्धा परीक्षांमध्ये
सत्र २०२४-२५ मध्ये कारंजातील श्री.ज्ञानवर्धिनी संस्कृत शिकवणी वर्ग केंद्राद्वारे वेगवेगळ्या शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्या विद्यार्थ्यांपैकी जे.डी.चवरे विद्यामंदिरातील वर्ग आठवी मधील,कु.प्रियांशी प्रितेश इंदाने व मंदार प्रशांत धुर्वे हे दोन विद्यार्थी ९२ गुण प्राप्त करून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करून जिल्हास्तरीय परीक्षेमधून राज्यस्तरीय पुरस्काराकरिता पात्र झाले, जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवून त्यांनी आपले कौशल्य दाखविले.
या परीक्षेमध्ये एकूण ९७ सहभागी होते.त्यांना कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय मार्फत निर्धारित रोख पारितोषिक धनादेशाच्या स्वरूपामध्ये,तसेच सुवर्णपदक व सन्मान चिन्ह तसेच विद्यापीठाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले.त्याबद्दल
शाळेचे व्यवस्थापक मंडळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.श्रीनिवास जोशी व सर्व शिक्षक शिक्षकेतरांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. साप्ताहिक करंजमहात्म्य परिवार आणि विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा तर्फे अध्यक्ष संजय कडोळे यांनीही त्यांचे कौतुक केले आहे.