वाशिम : (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : राज्यातील धनगर समाजातील लोकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी धनगर समाजातील ग्रामीण भागातील लोकांसाठी 10 हजार घरकुल देण्याचा निर्णय 6 सप्टेंबर 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार घेण्यात आला आहे. या योजनेसाठ जातीचा दाखला, आधारकार्ड, 1 लक्ष 20 हजार रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्नाचा दाखला, अल्पभूधारकाचा दाखला, महाराष्ट्राचे अधिवास असल्याचा दाखला, रेशकार्ड, 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर कोणत्याही घरकुलचा लाभ घेतला नसल्याचे हमीपत्र व शासन निर्णयानुसार नमूद केलेल्या सर्व अटी व शर्तीच्या पूर्तता करुन विहीत नमुन्यात प्रस्ताव ग्रामपंचायत कार्याल्याकडे सादर करावा.
या योजनेकरीता इच्छुक लाभार्थ्यांनी अधिक माहितीसाठी व अर्ज मिळण्याकरीता जवळच्या ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी, पंचायत समिती (सर्व) किंवा सहायक आयुक्त, समाज कल्याण, वाशिमकडे संपर्क साधावा. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी कळविले आहे.