कारंजा (लाड) : सालाबादप्रमाणे यंदाही कारंजा (लाड) येथील जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळ कारंजा तथा विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे संस्थापक अध्यक्ष असलेले महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त समाज प्रबोधनकार संजय मधुकरराव कडोळे तथा हभप माणिक महाराज हांडे यांनी कारंजा / अकोला येथील मोजक्या वारकरी मंडळीची दिंडी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे नेलेली असून या दिंडीमध्ये श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेमध्ये संजय कडोळे हे अंधश्रध्दा निर्मूलन, व्यसनमुक्ती निर्मूलन, हुंडापद्धती निर्मूलन आणि वृक्षारोपनावर भर देत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहीती वारकऱ्यांना देत असून संविधान जागर करीत आहेत .
बुधवार,दि. 29 जून 2022 रोजी त्यांनी चंद्रभागा वाळवंट, श्री संत गजानन महाराज मंदिर, गोपाळपूरी इत्यादी ठिकाणी संपूर्ण दिवसभर जनजागृती केली. त्यांच्या जनजागृती समाज प्रबोधनाला वारकरी मंडळीकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे .