अडाण नदीचे पाणी पात्र सोडून इंझोरी गावापर्यंत पोहोचले.अनेकांच्या जमिनीतील बहरलेली पिके गेले वाहून.शेतांमध्ये चोहीकडे फक्त पाणीच पाणी.
मानोरा : मानोरा तालुक्यातील इंझोरी मंडलात,आजूबाजूच्या गावखेड्यात उंबरडा (लहान) इत्यादी भागात झालेल्या ढगफुटी सदृश्य अति सततधार पावसाने, आजूबाजूच्या गावखेड्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या असून,शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शेतजमिनीवरील,नुकतीच बहरत असलेली सोयाबीन तुर व इतर सर्वच पिकांचे भयंकर स्वरूपाचे नुकसान झाले असून, शेतकरी राजाची स्वप्ने पूर्णपणे उध्वस्त झालेली आहेत. तरी विवंचनेत पडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे तात्काळ पंचनामे करण्यात येवून,त्यांना लवकरात लवकर अर्थसहाय्य देऊन, आधार देण्याची मागणी इंझोरी मंडळातील इंझोरी, उंबरडा (लहान ), धामणी (खडी) रस्त्यावरील शेतीनिष्ठ गावकर्यांनी शासनाकडे लावून धरली असल्याचे वृत्त आमचे प्रतिनिधी डॉ .कलिम मिर्झा यांनी, महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेकडे दिल्याचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे.