नागभीड रानपरसोडी येथील एका व्यक्तीने गावाजवळच्या विहिरीत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी नागभीड पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.
मंगेश यशवंत कुळे (४२) असे या व्यक्तीचे नाव आहे. मंगेश सकाळीच देण्यात आली. शेतावर गेला. मात्र, दुपारचे १२ वाजून गेले तरी तो परत आला नाही. घरी का आला नाही म्हणून शेजारच्या व्यक्तींनी शेताकडे जाऊन बघितले असता विहिरीजवळ त्याच्या चपला दिसून आल्या. विहिरीत गळ टाकून पाहिले असता त्याचा मृतदेहच गळाला लागला. मृतदेह आढळताच उपस्थितांना मोठा धक्का बसला. या घटनेची माहिती लगेच मृत मंगेश कुळे नागभीड पोलिसांनापोलिसांनी घटनास्थळ गाठून मोका पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. आत्महत्येमागील कारण कळू शकले नाही. अधिक तपास नागभीड पोलिस करीत आहेत.