अकोला-जिल्ह्याला चार पिढ्यापासून रचनात्मक व उज्वल पत्रकारितेची परंपरा लाभली असून नवी पिढी पण ही परंपरा रचनात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून निभावत आहे. शहरी व ग्रामीण पत्रकारितेच्या विकासाची वाट धरून जिल्हा पत्रकार संघ पण गत पन्नास वर्षापासून आपली सेवा निभावत असून पत्रकार संघाच्या अशा उज्वल परंपरेने आपण भारावून गेलो असल्याचे मत खा.अनुप धोत्रे यांनी व्यक्त केले.मराठी पत्रकार परिषद,मुंबई संलग्नित जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने निमवाडी येथील पत्रकार संघाच्या पन्नालाल शर्मा सभागृहात पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान सोहळा व पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.मराठी पत्रकार परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांच्या अध्यक्षतेत संपन्न या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून खा अनुप धोत्रे बोलत होते.

यावेळी मंचावर माजी राज्यमंत्री अजहर हुसेन,आ वसंत खंडेलवाल ,जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजुरकर, कृषी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी किशोर बिडवे ,जेष्ठ पत्रकार कीर्तीकुमार वर्मा, प्रल्हाद ढोकणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. जिल्हा पत्रकार संघाच्या दिवंगत ज्येष्ठ पत्रकारांच्या प्रतिमा माल्यार्पण व दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा पत्रकार संघात प्रथमच उपस्थित झालेले खा अनुप धोत्रे, आ वसंत खंडेलवाल यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. खा धोत्रे पुढे म्हणाले, जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्येच्या संदर्भात आपण अवगत असून ज्येष्ठ पत्रकारांना शासनाकडून योजनांचा लाभ मिळाला पाहिजे तसेच सेवानिवृत्त पत्रकारांना पेन्शनचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी आपण अगत्याने पाठपुरावा करणार असल्याची हमी खा अनुप धोत्रे यांनी यावेळी केली. या सोहळ्यात माझी राज्यमंत्री अजहर हुसेन यांनीही जिल्ह्यातील पत्रकारितेच्या उज्वल परंपरेचे माहिती सांगितली. कार्यक्रमात पत्रकारितेच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असणाऱ्या पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते पत्रकारिता पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. पत्रकार संघाच्या सालाबाद प्रमाणे आयोजित या सोहळ्यात यावेळी स्व मधुसूदन वैराळे स्मृती ग्रामीण विकास वार्ता पुरस्कार तेल्हारा येथील प्रशांत विखे यांना प्रदान करण्यात आला,तर स्व कमल किशोर बियाणी यांच्या स्मृतीत शहरी विकास वार्ता पुरस्कार पुरुषोत्तम ढोले यांना, स्व शांताराम सरदेशपांडे स्मृती शोध वार्ता पुरस्कार सूर्यकांत
भारतीय यांना तर धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील रामेश्वरलाल अग्रवाल परिधानवाले स्मृती पुरस्कार अकोट येथील वामन जकाते यांना, स्व जमनलाल गोयनका स्मृती व्यापार उद्योग उत्कृष्ट वार्ता पुरस्कार राजकुमार उखळकर यांना, स्व गो.रा. वैराळे स्मृती कला व साहित्य पुरस्कार वंदना शिंगणे यांना तर पै.खान मोहम्मद असगर हुसेन सामाजिक एकता पुरस्कार मोहन जोशी यांना, स्व दिनेश कक्कड स्मृती क्रीडा क्षेत्र उत्कृष्ट वार्ता पुरस्कार मूर्तिजापूर येथील दीपक जोशी यांना, स्व आबाराव देशमुख स्मृती पत्रकारिता जीवनगौरव मूर्ती पुरस्कार बाळापूर येथील रमेश ठाकरे यांना प्रदान करण्यात आला.स्मृतीचिन्ह शाल व रोख हे या पुरस्काराचे स्वरूप होते.

या सोहळ्यात अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षांचाही सन्मान करण्यात आला. यामध्ये अकोट येथील मंगेश लोणकर, तेल्हारा येथील प्रल्हादराव ढोकणे, बाळापूर येथील मोतेबर देशमुख, पातुर येथील सतीश सरोदे, दिलीप देशमुख, बार्शीटाकळी येथील साहेबराव गवई यांना सन्मानित करण्यात आले तर पत्रकार संघाची सेवा करणारे कमल शर्मा, विलास खंडारे, समाधान खरात, दिलीप दांदळे, दीपक देशपांडे, शरद गांधी, अजय जागीरदार, मुकुंद देशमुख आदींचाही नामोल्लेख करण्यात आला. सोहळ्याच्या उत्तरार्धात जिल्ह्यातील पत्रकारांच्या इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत पाल्यांचा स्मृतीचिन्ह, बॅग व प्रशस्ती पत्र प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यात भावना भेंडेकर, सत्यजित देशमुख, तेजस्विनी बावणे, मधुरा आहेरकर,उत्कर्ष लोणकर, सत्यार्थी सावरकर,प्रा प्रवीण ढोणे, मोहम्मद साहेबान, आकांशा रावत, वर्णा चव्हाण,आयुषी भाटिया, जानवी जोशी,ऋषिकेश ढोणे, तेजस शिंदे, गोपाल गिरडकर, श्रेयस सावरकर, सय्यदा आर्किया नाजीश आदींना यावेळी सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतली मिरसाहेब यांनी करून जिल्हा पत्रकार संघाच्या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी जेष्ठ पत्रकार सूर्यकांत भारतीय यांनी आपले मनोगत व्यक्त करीत पत्रकारांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी स्वतःची आर्थिक फळी निर्माण करण्याचे आवाहन केले.यावेळी अकोट येथील जेष्ठ पत्रकार किर्तीकुमार वर्मा यांनी पत्रकार संघास दहा हजार रुपयांची मदत केली. अध्यक्षीय मनोगत सिद्धार्थ शर्मा यांनी व्यक्त करीत प्रसारमाध्यमांमधील काम करणाऱ्या सर्व वर्गातील सेवेकऱ्यांचा हा संघ असून यात माध्यमांमधील सर्व श्रेणीचा वर्ग सामूहिकपणे विकासात्मक पत्रकारिता करीत असल्याचे सांगितले. संचालन जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रमोद लाजूरकर यांनी तर गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्याचे संचालन राजीव उखळकर यांनी केले. आभार पत्रकार संघाचे पदाधिकारी विजय शिंदे यांनी मानलेत.यावेळी सतीश सरोदे, प्रदीप काळपांडे,उमेश देशमुख, मोहन जोशी,संगीता इंगळे, अब्दुल कद्दूस, किरणकुमार निमकंडे, विजय सारभूकन,प्रदीप खाडे, संदीप मोडक, रामदास काळे, प्रा मोहन खडसे, गुलाम मुस्तफा, रमेश तेलगोटे, डॉ रहमान, शाहिद इकबाल, सुरेश शिंगणारे, संतोष विनके, प्रकाश भंडारी,राजेंद्र बाहेती,दीपक देशपांडे, बबनराव ठाकरे, विठ्ठलराव देशमुख, गजानन देशमुख, अजय प्रभे, दीपक जोशी, अविनाश बेलाडकर, दिलीप देशमुख, जयप्रकाश रावत,निलेश सुखसोळे,मंगेश कक्कड, शहाबाद देशमुख, अनिल मावळे,गजानन हरणे ,दत्तात्रय भटकर,अनिल अवताडे,नीलिमा शिंगणे,संगीता इंगळे, यशपाल चौधरी समवेत जिल्हा पत्रकार संघाचे समस्त पदाधिकारी, सदस्य, मान्यवर नागरिक, महिला पुरुष व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....