कारंजा (लाड) : येथील महात्मा फुले चौकात,जुन्या नगर पालिका दवाखान्याच्या प्रवेश द्वारा जवळ असलेल्या इलेक्ट्रिक डी पी ला अचानक शॉट सर्किट मुळे आग लागली होती. अल्पवेळेतच ही डी पी जळून खाक झाली.आग लागल्याची माहिती अंकुश झोपाटे यांनी श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली.
त्यांनी तात्काळ घटनेची माहिती अग्निशामक दल कारंजा यांना देताच नगरपरिषद कारंजा अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविले.त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या प्रसंगी अग्निशामक दल हजेरी ड्रायव्हर संजय रेवाळे, फायरमॅन अहमद खान, मुजबबील खान,संकेत आगमे,कारंजा नगर परिषद अग्नीशामक दल यांनी आगीशी झुंज देत सतर्कतेने आग विझवली व पुढील अनर्थ टळला .