अकोला-- देशमुख समाज महिलांकडून अकोल्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून महिला सबलीकरणासाठी व्यवसाय प्रोत्साहनासोबतच विविध सेवाभावी सामाजिक उपक्रम सातत्त्याने सुरू असून दर महिन्यात एकत्रीकरणातून कार्यक्रमा़चे नियोजन असते.त्यामुळे सामाजिक क्षेत्रात कर्तृत्ववादी महिलांचा एक सक्रिय ग्रूप म्हणून सिध्द होण्याचा बहूमान अकोला देशमुख महिला मंडळाला समाजातून प्राप्त होत आहे.

या देशमुख महिला मंडळाच्या " मिताली राज" ग्रूपकडून नुकतेच चैत्रोत्सवाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमात महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्याच्या उध्देशाने देशमुख महिला मंडळाच्या मंडळाच्या अध्यक्षा सौ.राजश्रीताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याला मासिक सभेचे आयोजन असते.यावेळी आयोजित सभेत त्यांनी महिला मंडळाच्या सामाजिक कार्याचा प्रगतीकारक आलेख सादर केला. आपल्या प्रास्ताविक भाषणांतून कविता ताई ढोरे यांनी काम करण्यातील सातत्त्य आणि पाया भक्कम असला म्हणजे आकाशालाही गवसणी घालता येते हे सत्त्य आहे.त्याची प्रचिती देशमुख महिला मंडळाच्या लावलेल्या रोपट्याचा आज झालेल्या वटवृक्षातून आलेली असल्याचे मत यावूळी व्यक्त केले.प्रमुख अतिथी म्हणून सौ.संध्याताईंनी आपल्या वऱ्हाडी शैलीतील मनोगतातून महिलांची मने जिंकून घेतली.डॉक्टर स्वाती यांची बहारदार मराठमोळी लावणी सर्वोत्कृष्ट ठरली. हाऊजी खेळात रोहिणी,उज्ज्वला,माया,किरण,
अरूणा,संध्या,श्वेता,तृप्ती,प्रांजली,मनिषा,विशाखा,प्रतिभा,जयश्री,संध्या,मिलन,सुषमा,ज्योती,प्रगती,वर्षा ह्या विजेत्यांना बक्षिसे वितरीत करण्यात आली.महिलांच्या दैनंदिन जीवनातील विविध भुमिकांचा नृत्त्यातून आविष्कार घडविण्यात आला. मनोरंजनात्मक "पिक अप व बॉटल" हा घेतलेल्या ग्रूपमधील खेळात शितल, वैशाली , पौर्णिमा,निशा,
कल्पना, विजया, अंजली, सारिका,निता,,वैशाली ह्या विजयी झाल्या.ड्रेस कोडच्या विजेत्या नयना देशमुख,कल्पना देशमुख ह्या ठरल्या.अकोला बार असोसिएशनच्या उपाध्यक्षा तथा आर्ट ऑफ लिव्हिंग च्या प्रशिक्षक अॕड.कांचन शिंदे यांनी बलून गेमच्या माध्यमातून आनंदी जीवनाचा संदेश दिला.
गेल्या आठवड्यात माता तुळजाभवानी दिपप्रज्वलन,पुजा वंदन,त्याचप्रमाणे समाज रत्न डॉ.पंजाबराव देशमुख,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.बाबासाहेबांना जयंतीनिमित्त मेनबत्त्या पेटवून मानवंदना देण्यात आली.कार्यक्रमाचा शुभारंभ देवयानी व श्रीया यांच्या गणेश वंदना नृत्त्यापासून करण्यात आली.शिल्पा व स्वप्ना यांनी वेशभूषा सादर केली.याप्रसंगी चैत्रोत्सव म्हणून महिलांच्या ओट्या भरून,हळदीकुंकवाच्या आयोजनाने सन्मानपूर्वक महिला शक्तीचे स्वागत करण्यात आले.
त्यातीलच एका वेगळ्या कार्यक्रमात भारतीय संस्कृतीतील गोमातेचे महत्व लक्षात घेऊन स्थानिक गोरक्षण संस्थेमध्ये गाईंना ढेप,चणे,गुळ असे असा गोठ्यास अर्पण करून गाईंचे संरक्षण करणाऱ्या सेवेकरी महिला व पुरुषांना उन्हापासून संरक्षणासाठी दुपट्टे आणि स्ट्रोलचे वाटप करण्यात आले.अकोला जिल्हा स्त्री रूग्णालयात रूग्णांना भोजनाचे वाटप करण्यात आले.
सौ.मंजुषा व डॉ. स्वाती यांच्या बहारदार संचनाखाली झालेल्या कार्यक्रमांमधील हे संमिश्र भरगच्च विविध उपक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्षा राजश्री देशमुख यांचेसह,मिताली राज ग्रूप च्या सर्व सदस्या,ज्येष्ठ मार्गदर्शिका कविता ढोरे, महिला मंडळाच्या पदाधिकारी,उपाध्यक्षा नयना देशमुख,माजी अध्यक्षा कल्पना देशमुख,सचिव स्वप्नाली देशमुख, सविता, ज्योती, मंजू, स्वाती,विजया मिना,उज्ज्वला, वैशाली,अनघा,देवयानी, दिप्ती, शुभांगी,सिध्दी,भावना,पुजा,स्मिता,संध्या,अभिलाषा,कविता,सविता,ज्योती,मंजू,स्वाती,विजया,मिना,माया,उज्ज्वला,वैशाली तसेच लता सिसोदिया,व "विश्वजागृती मिशनच्या" पदाधिकारी महिला व पुरुष पदाधिकारी, यांची उपस्थिती व वेळोवेळी अनमोल सहकार्य लाभले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....