अहेरी (गडचिरोली) : जिल्ह्यातील अहेरी तालुका परिसरात वेलगुर ग्रामपंचायत अंतर्गत अनेक शेतकरी बांधवांचे वनदावे प्रलंबित असल्याने सदर शेतकरी वर्ग २००५ पासून शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवित असून दिनांक २२ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे परिसरातील काही शेतकरी वनदाव्या संबंधाने अपिलीय अर्ज सादर केलेले होते त्यांच्या सुनावणीकरिता आलेले होते. काही शेतकऱ्यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले आहे की बळीराजाच्या जीवनातील संघर्ष कसा असतो ते वातानुकूलित खोलीतील अधिकारी यांना कस कळणार, एकीकडे निसर्ग साथ देत नाही, तर मिळालेल्या उत्पादनाला दलालांच्या घशात घालाव लागते आणि स्वतःच्या रक्ताचं पाणी करून वहिवाट करीत असलेल्या शेती करिता स्वतःचा मालकी हक्क मिळत नाही त्याला काय म्हणावं बळीराजाच दुर्दैव की आणखी काय? २००५ पासून आज पर्यंत अनेकदा शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या मारलेल्या आहेत वर्ष २०२१ पूर्वी वन हक्क दाव्यांच्या संबंधाने अर्ज सादर केलेल्या काही शेतकऱ्यांना शासनाकडून पत्र पाठवून पुन्हा अपिलीय अर्ज विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे सादर करण्यास सुचविलेले होते सदर पत्राला अनुसरून सर्व शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे स्वतः जाऊन आपले अपिलीय अर्ज सादर केले त्या अपिलीय अर्जाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे सर्व मुळ दस्तऐवज तपासणी करून सुनावणी ठेवण्यात आलेली होती. सदर सर्व शेतकरी बांधवांना न्याय देऊन मागील अनेक वर्षांपासून वहिवाट करीत असल्याने मालकी हक्क द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यावेळी ग्राप उपसरपंच उमेश मोहूर्ले, साईनाथ नागोसे, प्रवीण रेसे, भिकरू निकोडे, परशराम गुरनुले, महेंद्र वसाके, जोगा शेंडे, पिंटू नागोसे, भिकारू कोटरंगे, मोरेश्वर कोटरंगे, ठाकरे, राजू मोहूर्ले व मोठ्या संख्येनी पुरुष शेतकरी बांधवासह महिला सुध्दा हजर होत्या.