महाराष्ट्र शासनाने दि.१ जुलै २०२४ पासुन संपुर्ण राज्यामध्ये “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" ही योजना कार्यान्वीत केली असुन सदर योजनेची गतीमान व प्रभावी अंमलबजावणी करण्यातचे निर्देशित केले आहे.
सदर योजनेकरीता अर्ज करण्याची अंतिम ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. सदर योजनेअंर्तगत ऑफलाईन व नारी शक्ती या अॅप वरून ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ऑफलाईन पध्दतीने अर्ज करण्याकरीता आपल्या गावातील अंगणवाडीसेविका व ग्रामसेवक यांच्याकडे अर्ज सादर करावे. सदर अर्ज भरण्याकरीता कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही.
कोणताही शासकीय लोकसेवक अतिरिक्त शुल्काची मागणी करत असल्यास संबंधित लोकसेवकाची तक्रार तहसिलदार,वाशिम यांचेकडे करावी. सदर योजनेसाठी अर्ज करण्याकरीता ३ जुलैच्या शासन निर्णयानुसार उत्पन्नाचा दाखला नसल्यास त्या एवेजी १५ वर्षापुर्वीचे केशरी किंवा पिवळे राशनकार्ड ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच
अधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्याऐवजी शाळेचा दाखला, जन्माचा दाखला गृहीत धरण्यात येणार आहे. सदर योजनेचा अधिकाधिक बहिणींनी लाभ घ्यावा.असे आवाहन निलेश पळसकर तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी वाशिम यांनी केले आहे.