नगर परिषद ब्रम्हपुरी येथिल सर्व वार्डा मध्ये ये-जा करण्याचे मार्गवर दिवस रात्र मोकाट जनावरे गाय-बैल, डुक्कर, कुत्रे यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात झाली असून मोठ्या प्रमाणात गायी-बैल भर रस्त्यांवर चौका चौकात बसुन रहदारीस अडथळा निर्माण करीत आहेत, तर डुक्कर आणि कुत्र्यांनी सुध्दा चौकाचौकात नागरी वस्तीत घराच्या सभोवताल नेहमीच हिंसक स्वरूपात दिसतात त्यावर नगरपरिषद तर्फे नेहमीच विविध कारणे देतं कुठलीही कारवाई करण्यात येत नाही. ब्रम्हपुरी सारख्या ठिकाणी विवीध शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी शाळा - कॉलेज, ट्युशन्स ला जातांना त्यांच्यावर कुञ्यांचे भुंकणे विद्यार्थ्यांच्या मागे धावणे यामुळे विद्यार्थी जीव मुठीत घेऊन ये-जा करतात माकडांमुळे पण समस्त वॉर्ड येथील नागरीक त्रस्त झाले आहेत. तरी सर्व वॉर्ड वासियांना मार्ग सूखर करा.अशी मागणी विश्व् हिंदू परिषद ब्रम्हपुरी कडून ब्रम्हपुरी नगरपरीषदला निवेदनाद्वारे केली आहे.