कारंजा : कारंजा येथून जवळच असलेल्या ग्राम पोहा येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त पोलिस निरिक्षक राजुभाऊ बळीरामजी अवताडे यांनी सेवानिवृत्ती झाली असल्यामुळे, आपले उर्वरीत आयुष्प तन मन धनाने,भटक्या विमुक्त समाजाचे कैवारी आपले दिवंगत वडील स्व बळीरामजी अवताडे यांनी दाखविलेल्या मार्गाने व्यतित करून महाराष्ट्रातील विखुरलेल्या संपूर्ण भटक्या विमुक्त समाजाची वज्रमूठ करण्याच्या उद्देशाने दौरे आयोजीत केले आहेत .
सध्या राजुभाऊ बळीरामजी अवताडे हे चित्रकथी समाजाचे वाशिम जिल्हाध्यक्ष असून, लवकरच त्यांनी भटक्या विमुक्त समाज संघटनेच्या स्थापनेचे ध्येय बाळगले आहे . त्यामुळे नुकतेच त्यांनी. ग्राम डाळिंबी,कोळंबी, बोरगाव मंजू व अकोला येथील भटक्या विमुक्त ब प्रवर्गातील जमातीच्या लोकांच्या समस्या जाणून घेण्याकरीता दौरा केला यावेळी राजुभाऊ अवताडे यांचे सोबत संतोषनाथजी गोरे अध्यक्ष नाथजोगी समाज संघटना अमरावती,गजाननराव वनारसे, जगदीश भोजने, लखन अवताडे आदी सामाजिक कार्यकर्ते होते डाळिंबी कोळंबी येथील नाथजोगी, भराडी समाजाच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या . या समाजातील भटकंती करणारी ही मंडळी गेल्या कित्येक वर्षापासून आजही पालाच्या झोपड्यामध्ये अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये जीवन व्यतीत करीत आहेत.त्यांना तेथे शिक्षणाच्या सुविधा, आरोग्य सुविधा, लाईटची व्यवस्था, पिण्याच्या पान्याची व्यवस्था नसल्याचे दिसून आले. तसेच बोरगाव मंजू येथील गाडी लोहार पांचाळ समाजाच्या लोकांच्या सुद्धा व्यथा असून अद्याप पर्यंत त्यांना घरकुल मिळत नसल्याची शोकांतिका आहे . आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असतांना भटक्यांना, रोजगार उद्योगधंद्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास असमर्थ ठरल्यामुळे त्यांनी, शिवसेना वसाहत अकोला येथे भटक्या विमुक्तांची विभागीय बैठक घेऊन सेवानिवृत्त राखीव पोलीस निरीक्षक गजाननराव इंगळे , राहुल भाऊ , सौ राखी ताई लिहिले इत्यादी कार्यकर्त्यां सह तात्काळ अकोला जिल्हाधिकारी गाठून निवासी जिल्हाधिकारी - संजय खडसे सर, यांचे समोर भटक्या समाजाच्या व्यथा मांडून, मुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदे यांचेकरिता, लेखी निवेदन देऊन तात्काळ डाळंबी, कोळंबी, बोरगाव मंजू येथील समाज बांधवाच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांगतिले . याबाबत आंदोलन छेडण्याकरीता पुढील नियोजन लवकरच करणार असल्याचे सुद्धा कळवीले .