दिनांक 29 डिसेंबर 2024 रोज रविवारला डोळ्यांचे आरोग्य आणि त्याचे महत्त्व याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा,मुरमाडी येथे विद्यार्थ्यांसाठी लायन्स क्लब गडचिरोली तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर उपक्रमाचा 225 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
डोळ्यांची निगा कशी राखावी ह्यावर डॉ. श्रावंती कोलुरी, वैद्यकीय अधिकारी ह्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर जिल्हा सामान्य रुग्णालय,नेत्र विभाग, गडचिरोली ह्यांच्या चमूतर्फे तर्फे नेत्र तपासणी आणि आरोग्य तपासणी करण्यांत आली.
ह्यावेळी लॉयन्स क्लबचे अध्यक्ष मंजुषा मोरे,सचिव नितिन चंबुलवार,झोन चेअरपर्सन दीपक मोरे, कॅबिनेट ऑफीसर सुरेश लडके,नितीन बट्टुवार आदी सदस्य तसेच हेमंत चुधरी माध्यमिक मुख्याध्यापक ,देविदास लांजेवार प्राथमिक मुख्याध्यापक,दिनेश ठाकरे, सपना ठाकरे,रंजू उंदिरवाडे,यशवंत भोयर,गोविंदा ठाकरे,मुखरूजी लाडवे,दादा भोयर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय नरूले ह्यांनी केले तर हेमंत चुधरी ह्यांनी आभार मानले.