पोलीस प्रशासनाकडून अवैध दारू विक्री वर कारवाई करून जप्त करण्यात आलेला देशी विदेशी दारू चा साठा नष्ट करण्याचे काम माजरी पोलिसांकडून करण्यात आले आहे.
माजरी पोलिसांनी लाखो रुपयांची पकडलेली अवैध देशी व विदेशी दारू नष्ट केली आहे. माजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही वर्षांमध्ये सहा लाख एक्केवीस हजार एकशे ट्रेसठ रूपयांची देशी व विदेशी अशी अवैध दारू कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेली होती. ते न्यायालयाच्या आदेशानुसार दारूबंदी विभागाचे अधिकारी सचिन पोळेवार व पंचासमक्ष संपूर्ण दारू वर बुलडोझर चढवून नष्ट करुन त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आलेली आहे. सदर कार्यवाही माजरी च्या ठाणेदार अजितसिंग देवरे व इतर पोलीस कर्मचारी आणि उत्पादन शुल्क अधिकारी आणि पंचाच्या समक्ष नष्ट करण्यात आले. या दारूचा साठा माजरी पोलीस ठाण्यात जमा होता इतर समान ठेवायला अडचण होत असल्याने रीतसर न्यायालयाचि परवानगी घेऊन मंगळवार ला विल्हेवाट लावण्यात आले.