चंद्रपूर, दि.2 : सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा आणि त्यांच्या अवलंबितांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा उद्योग केंद्र, खादी व ग्रामोद्योग मंडळ तसेच जिल्हा कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने विविध रोजगाराभिमुख अल्पकालीन प्रशिक्षण तथा विविध रोजगार विषयक योजना राबविण्यात येत आहेत.
सर्व इच्छुक माजी सैनिक, माजी सैनिक विधवा आणि त्यांचे अवलंबित यांनी प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आपली माहिती व नाव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास लवकरात लवकर कळवावी. जेणेकरून प्रशिक्षणासाठी आवश्यक त्या यादीत आपले नाव समाविष्ट करता येईल. काही अडचणी आल्यास कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 07172- 257698 वर संपर्क साधावा. या संधीचा जास्तीत जास्त संख्याने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या वतीने करण्यात येत आहे.