भगवान 1008 महावीर जयंतीचे औचित्य साधून दिवसभर जैन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम त्यानंतर सायंकाळी देवेंद्र कीर्ती सभागृह या ठिकाणाहून शहराच्या प्रमुख मार्गाने भगवान महावीर यांचा संदेश देत भव्य शोभायात्रा उत्साहात पार पडली.
शोभा यात्रेमध्ये घोड्यांचा सहभाग, लेझीम, बँडपथक, भजनीमंडळे, आदिचा सहभाग होता. तसेच भगवान महावीरांची प्रतिमा विराजमान असलेला रथातून शोभा यात्रा मार्गक्रमण करीत असताना युवक युवती व लहान बालके तसेच भगवान महावीर यांच्या वाणीचा प्रचार करीत होते. जयघोषाने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. शोभा यात्रेदरम्यान देवडा व गोलेच्छा परिवाराकडून तसेच सतांबर जैन मंदिराकडून थंड सरबत व पाण्याचे वाटप करण्यात आले. या शोभायात्रेत अश्वावर गंधक व चाणेकर कुटुंबातील सदस्य वेशभूषा घालून स्वार झाले होते. त्यामुळे या शोभायात्रेला अधिकच महत्त्व आलं
शोभा यात्रेदरम्यान नेविपुरा परिसरात या भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पूजन घरोघरी जैन बांधवांकडून करण्यात आले. या शोभायात्रेत युवक व मुलींनी डान्स करून शोभा यात्रेची अधिक शोभा वाढवली . या शोभायात्रेत सकल जैन समाजातील पुरुष महिला युवक-युवती व लहान बालकांचा जैन धर्मातील पताका व झेंडे घेऊन हिरिरीने सहभाग होता. भगवान महावीर यांचा जयघोष शुद्ध शाकाहारीचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून शहरवासीयांना देण्यात आला. या रॅलीत ठाणेदार आधारसिंह सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त लावण्यात आला होता शासनाच्या नियमाला अनुसरून ही जैन धर्माची शोभा यात्रा पार पडली. यानंतर शोभा यात्रा मंदिरात पोचल्या नंतर १००८ श्री भगवान महावीर जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सतीश भेलांडे,प्रमुख व्याख्यात्या बा. ब्र. सविता दीदी भोपाल व भारती दीदी , समाजातील प्रमुख पाहुणे जेष्ठ समाजबांधव अरुण कुमारजी नांदगांवकर , धन्यकुमारजी मांडवगडे , वसंतकुमारजी वैद्य, अतुलजी काळे , शैलेश चढ़ार एड संदेश जिंतुरकर यांची उपस्थिती होते. समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
प्रमुख व्याख्यात्या बा. ब्र. सविता दीदी यांचा परिचय वृंदाताई चवरे यांनी करुन दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदर्शन दर्यापूरकर व विवेक गहाणकरी तर आभारप्रदर्शन पवन उखळकर यांनी केले. असे वृत्त प्रत्यक्षदर्शी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी प्रसारमाध्यमाला कळविले आहे .