समोरून येणाऱ्या ट्रकला दुचाकीची धडप होऊन दुचाकी चालक जागीच ठार झाला तर दुसरा एक व्यक्ती गंभीर जखमी झाला ही घटना दिनांक 14 मार्च दुपारी दोनच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील सावलखेडा या गावाजवळ घडली. ज्ञानेश्वर सहारे(37) रा. बेलगाव (ता. कुरखेडा) असे ठार झालेल्या इसमाचे नाव असून अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव कोकसू नंदेश्वर (65) रा.येगलखेडा मृत ज्ञानेश्वर साहारे त्यांचे सासरे परसराम बंधू यांच्याकडे सकाळी पाहुणे म्हणूनआले होते. दुपारी जेवणानंतर आपल्या स्वगावी परत जात असताना सावलखेडा जवळून थोड्याच अंतरावर समोर येणाऱ्या मालवाहक ट्रकला दुचाकीची धडक झाली त्यात ते जागीच ठार झाले
या अपघातात दुचाकी वर बसलेल्या दुसरा व्यक्ती गंभीर दाखल जखमी झाला असून प्राथमिक उपचारात जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे जखमीला भरती केले आहे.