वाशिम : जिल्ह्यात २५ नोव्हेंबरपर्यंत कौमी एकता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने सांप्रदायिक
सदभावना मोहीम निधी संकलन सप्ताह २४ नोव्हेंबर रोजी “ध्वजदिन” साजरा करण्यात येणार आहे.
ध्वजदिन दिनी संकलीत केलेला निधी राष्ट्रीय सांप्रदायिक सदभावना प्रतीष्ठान,नवी दिल्ली यांच्याकडे सुपुर्द करण्याकरीता पुढीलप्रमाणे कार्यपध्दती निश्चित केली आहे.
२४ नोव्हेंबर या दिवशी सर्व शासकीय कार्यालये,विद्यालये, महाविद्यालये,सार्वजनिक उपक्रम, महामंडळे,सार्वजनिक संस्था आणि देणगीदार यांच्याकडे स्वेच्छेने निधी संकलित करण्यात यावा.
शासकीय कार्यालये,विद्यालये, महाविद्यालये,सार्वजीक उपक्रमे व महामंडळे या कार्यालयातील कर्मचा-याकडुन संकलित होणारा निधी डब्यातुन संकलीत करण्यात यावा.खाजगी संस्था व देणगीदार अथवा करदाते यांना या निधीसाठी रक्कम दान म्हणुन द्यावयाची असल्यास त्यांच्याकडुन अशी रक्कम धनादेशाव्दारे स्वीकारण्यात यावी. धनादेशाव्दारे स्वीकारलेल्या रक्कमेची पोच त्यांना देण्यात यावी.
खाजगी संस्था व देणगीदार अथवा करदाते यांच्याकडुन रक्कम धनादेशाव्दारे स्वीकारतांना धनादेश हा सचिव,राष्ट्रीय सांप्रदायीक सदभावना प्रतिष्ठान नवी दिल्ली या नावाने घेण्यात यावा.
निधी संकलीत करण्यासाठी प्रत्येक
जिल्हयातील जिल्हाधीका-यांनी व मंत्रालय विभागाने माजी सैनीक कल्याण मंडळे,रेड क्रॉस सोसायटी अथवा तत्सम संघटना यांच्याकडुन डबे उपलब्ध करुन घ्यावेत व निधी संकलित करण्याची कार्यवाही करावी.
या डब्यात संकलीत केलेला निधी हा कार्यालयातील जबाबदार अधिकाऱ्यासमोर मोजुन त्यांचा डिमांड ड्राफ्ट तयार करुन सचिव, राष्ट्रीय सांप्रदायीक सदभावना प्रतिष्ठान,सी विंग ९ वा मजला लोकनायक भवन,खान मार्केट,नवी दिल्ली -११०००३ यांच्याकडे नोंदणी टपालाव्दारे पाठवावा असे नमुद केले आहे.डब्यात संकलीत निधी सचिव, राष्ट्रीय सांप्रदायिक सद्भावना प्रतिष्ठान नवी दिल्ली यांना पाठविलेल्या रक्कमेची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात यावी. असे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....