कामरगाव सर्कल मधील बेंबळा येथील शेतकरी विशाल जोगी. यांनी जून मध्ये फुले दूर्वा kds 992 दिव्यरत्न कंपनीचे. सोयाबीनची पेरणी केली. पिकाची मशागत पूर्ण केली . परंतु सोयाबीनला फुलच आले नाही.
त्यामुळे शेतकऱ्याची बियाणे कंपनीने फसवणूक केल्याची तक्रार करण्यात आली.
दरवर्षी शेतकरी आपला जीव गहाण ठेवून शेती हा व्यवसाय करतो . कामरगाव येथील व्यंकटेश कृषी केंद्र. यांनी हे बियाणे उच्च प्रतीचे आहे. असे सांगून सदर बियानाची विक्री मोठ्या प्रमाणात केली परंतु या बियाणामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल झाली.सोयाबीनला फुलं न आल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला.
त्यामुळे आम आदमी पार्टी. ॲड मनीष मोडक, तसेच तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना, यांनी जागृत होऊन फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी साठी लढा उभारला आहे . ॲड मनीष मोडक, स्वाभिमानी शेतकरी संघटना, श्रीकांत ठाकरे, भारत भगत, विलास जोगी, विशाल ठाकरे, आशिष राठोड, यांनी सर्वांनी पुढाकार घेऊन, शेतकऱ्यांना मदतीसाठी कंबर कसली असून कृषी अधिकारी व तहसिलदारा मार्फत नुकसान भरपाईसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.