कारंजा : -- वाशिम जिल्ह्यातील कारंजा मानोरा मतदार संघात, मे महिन्याच्या मागील पंधरवाड्यात सतत झालेल्या वळवाच्या मुसळधार अवकाळी पावसामुळे,शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.शेतातील उन्हाळी भुईमूग, तीळ,फळबाग,पालेभाज्या,फुलबागा आदी पिके जमीनदोस्त झाल्यामुळे जगाचा पोशींदा भूमिपुत्र अस्मानी संकटाने त्रस्त व हवालदिल झाल्याचे चित्र आहे.त्यामुळे कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या कर्तव्यतत्पर महिलाआमदार सईताई डहाके यांनी नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या शेत बांधावर जाऊन शेतीची,पिकांची व झालेल्या नुकसानीची पाहणी केली.तसेच कारंजा महसूल विभागाला तात्काळ पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले. आणि शेतकऱ्यांना आश्वासीत केले की एकाही नुकसानग्रस्त शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही. नुकसानग्रस्तांना शासनाची भरघोस मदत मिळवून देणार असल्याचे आमदारांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले. महायुती सरकार हे शेतकऱ्यांप्रती संवेदनशिल आहे. लवकरात लवकर तुम्हाला मदत मिळणार असल्याचे आश्वासीत केले . यावेळी नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी करते वेळी कृषि विभागाचे कर्मचारी व महसुल विभागाचे नायब तहसीलदार वाडेकर,मंडळाधिकारी,तलाठी, ग्रामसेवक,सरपंच भाजपा माजी तालुका अध्यक्ष राजीव काळे इत्यादीसह परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.असे वृत्त मिळाल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे.