कारंजा (लाड) : सालाबादप्रमाणे विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे पदाधिकारी,अध्यक्ष संजय कडोळे,ज्येष्ठ सल्लागार देवमनजी मोरे, युवा पत्रकार एकनाथ पवार,गजानन चव्हाण, युवा पत्रकार फुलचंद भगत, अर्चना वाढणकर,हभप शिलाताई चिवरकर इत्यादी मंडळी रविवारी दि. 22 डिसेंबर 2024 रोजी,श्रीक्षेत्र गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या श्री गुरुदेव सेवाश्रमाला भेट देवून,समाधी स्थळाचे दर्शन घेऊन जगत्कल्याणाकरीता प्रार्थना करणार आहेत. येथील दर्शनाने आपणास मानवसेवेचे ऊर्जा मिळते.असे वृत्त विदर्भ लोककलावंत संघटनेकडून मिळाले आहे.