अकोला - भगवान शिवशंकराची लिला अपरंपार आहे. भगवान भोलेनाथ हे भक्तांच्या हाकेला नेहमी धावून आले असल्याची अनेक आख्यायिका आहेत. त्याचाच एक प्रत्यय हा अकोला येथील हरिहर पेठ स्थित जय भवानी मित्र मंडळाने थेट केदारनाथवरुन जल आणून त्याचा जलाभिषेक हा अकोल्यातील राजराजेश्वर महाराजांना करुन एक विक्रम करुन त्यांना आलेला आहे. बारा ज्योर्तिलिंगामधील एक असलेल्या श्री क्षेत्र केदारनाथ या ज्योर्तिलिंगाचे अंतर हे अकोल्यापासून तब्बल १६५० किलोमिटर असून तब्बल १६५० किलोमिटवरुन पायी कावडयात्रा आणून अकोलेकरांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. अवघ्या १८ किलोमिटर अंतरावरुन गांधीग्रामवरुन शिवभक्त पायी कावड आणतात तर अनेकांच्या पायाला फोड, पायाचे दुखणे हे दोन ते तीन दिवस चालते. हरिहर पेठ स्थित जय भवानी मित्र मंडळाने तब्बल १६५० किलोमिटरचे पायी अंतर कापून थेट अकोल्याचे राजराजेश्वर मंदिर गाठून केदारनाथाच्या जलाचा जलाभिषेक हा अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराजांना केला आहे. केदारनाथ ते राजराजेश्वरी नगरी ही कावडयात्रा पाहण्यासाठी नागरीकांनी एकच गर्दी केली होती. हरिहर पेठ स्थित जय भवानी मित्र मंडळाचे अध्यक्ष राजुभाऊ चव्हाण यांनी या कावडयात्रेचे आयोजन करुन स्वत: या कावडयात्रेमध्ये ते सहभागी झाले होते. जय भवानी मित्र मंडळ व सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेत ही कावडयात्रा पूर्णत्वास नेवून कावडा नेण्यापासून तर अकोला येथे पोहोचेपर्यंत आयोजन, नियोजन जाणे व येणे यामध्ये तब्बल दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागला असून जाणे-येणे खाण्या-पिण्याचे सर्व नियोजन हे जय भवानी मित्र मंडळाचे अध्यक्ष राजुभाऊ चव्हाण यांनी करुन केदारनाथ ते राजराजेश्वर नगरी ही कावडयात्रा पूर्णत्वास नेवून कावडयात्रेच्या परंपरेमध्ये अकोला राजराजेश्वर नगरीच्या नावे एक नवा विक्रम कायम केला आहे. अशी निखिल नाळे यांनी माहिती दिली