महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यभरात जनसंवाद पदयात्रा काढण्याचे ठरविले. त्यानुसार राज्याचे विरोधी पक्षनेता, माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंवाद पदयात्रा ब्रम्हपुरी शहरातील विविध प्रभागातील रस्त्यांवरून काढण्यात आली. यावेळी शहरात विविध प्रभागात असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांना हार घालून उपस्थित काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले.
काॅंग्रेसचे नेते, खासदार राहुलजी गांधी यांनी देशभरात काढलेल्या भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर ही पदयात्रा सुरू झाली असून सदर पदयात्रेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांबद्दल जनजागृती करणे, राष्ट्रीय व राज्य पातळीवरील जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे प्रश्न या समस्यांबाबत जनतेशी संवाद साधत जनभावना जाणुन घेणे या यात्रेचा उद्देश आहे. सदरची यात्रा ब्रम्हपुरी शहरासह तालुक्यातील विविध गावांत आयोजित काढण्यात आली आहे.
जनसंवाद पदयात्रेच्या समारोपप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा घेण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांची याठिकाणी भाषणे देखील झाली. जनसंवाद पदयात्रेत मोठ्या संख्येने काॅंग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

या जनसंवाद पदयात्रेत काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी प्राचार्य देविदास जगनाडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जि.प.सदस्य डॉ. राजेश कांबळे, नगराध्यक्षा सौ.रीताताई उराडे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, माजी जि.प.सदस्या स्मिताताई पारधी, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, माजी पं.स.सभापती नेताजी मेश्राम, न.प.नियोजन सभापती महेश भर्रे, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरज मेश्राम, न.प. महीला व बालकल्याण सभापती सुनिता तिडके, नगरसेविका लताताई ठाकुर, नगरसेविका सरिता पारधी, नगरसेविका निलीमाताई सावरकर, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष नामदेव लांजेवार, अनुसूचित जाती सेलचे जिल्हा सहसचिव प्रा.डि.के.मेश्राम, शहर काॅंग्रेसचे उपाध्यक्ष सोमेश्वर उपासे, प्रा. चंद्रशेखर गणवीर, सुधाताई राऊत, लीनाताई जोगे, मंगलाताई टिकले, रश्मीताई पगाडे, विनाताई घोडपागे, सुरेखाताई पारधी, कल्पनाताई तुपट, मेश्राम ताई यांसह अन्य काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....