आज दि 4/4/2022 ला दुपारी 2 वाजता चा दरम्यान लाखनी व साकोली राष्ट्रीय माहामार्ग क्र. 6 वर पो स्टे साकोली हद्दीतील मोघाटा जंगल परीसरात एका अज्ञात वाहनाचा धडकेत दुचाकी क्र. MH.36 H 4235 मोपेड गाडी चा भिषण अपघात झाला अपघात ईतका भिषण होता की दुचाकी चालक महीला व मागे बसलेली महिला दोन्ही महिलांचा उपचार दरम्यान मॄत्यु झाला अशी प्राथमिक माहिति आहे मृतका मध्ये सुरुची रविंद्र मल्लेलवार वय 24 वर्ष रा. गोंडउमरी यांचा लाखनी ग्रामीण रूग्णालय येथे उपचार दरम्यान मृत्यू झाला
तसेच दुसरी गंभिर जखमी महीला सोनाली राहुल संगिडवार वय 27 वर्षे रा. आकापुर. त. मुल जिल्हा चंद्रपुर येथिल असून यांचा भंडारा जिल्हा रुग्णालयात येथे उपचारासाठी नेत असतांना वाटेतच मृत्यु झाला .अपघात कशा मुळे झाला याचा पुढील तपास साकोली पोलिस करीत आहे