अकोला:- अमळनेरात २८ वर्षीय महिलेचा निघृण खून. स्थानिक पोलिसांसह एलसीबीचा तपास सुरुअमळनेर। शहरातील गांधलीपुराभागातील एका २८ वर्षीय महिलेचा खून ळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक तपासाला लागले आहे.शीतल जय मृत अवस्थेत बाजूला असलेल्या रिकाम्या जागेत पडलेली दिसून आल तिला डोक्याला मार लागलेला होता तसेच तिच्या गळ्यावर आवळल्याचे व्रण तर डोक्यावर व हातावर वार केलेला दिसून आला. घटनास्थळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, गणेश पाटील, सागर साळुंखे, निलेश मोरे, जितेंद्र निकुंभे, अमोल पाटील, सिद्धांत शिसोदे, स्थानिव गुन्हा अन्वेषण पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, रवी पाटील, दीपक माळी, संदीप पाटील यांनी पाहणी केली. दरम्यान महिलेचे शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले पोलिसांनी विविध दिशेने तपास चक्रे फिरवायला सुरुवात केली.
त्यानंतर पोलिसांनी तपास लावत त्या महिलेची नणंद मंगला परशुराम घोगले व करण मोहन गटायडे अशा दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. त्या नंतर या दोघांनी खाकी पाहून खून आपणच केला असल्याचे मान्य केले असून त्यांनंतर त्यांना पोलीसांनी अटक केली आहे.
अमळनेर शहरातील बंगाली फाईल येथील करण मोहन गटायडे व मंगला परशुराम घोगले म्हणजे मयत महिलेची नणंद यांचे काही दिवसांपासून प्रेम संबंध होते. मात्र हे सर्व शीतल जय घोगले हिला माहीत झाल्याने वरील दोघांनी तिला ठार मारले असल्याचे त्यांनी पोलिसांसमोर मान्य केलं आहे.
शौचालयास नणंद भावजाई दोघे सोबत गेले व येतांना एकटी नणंद मंगला घोगले हीच आली. येथून हा सर्व उलगडा पोलिसांनी लावत अवघ्या 7-8 तासातच गुन्ह्याचा छडा लावला आहे. अनिल राठोड़ जलगांव