कारंजा :- दारव्हा वेशी जवळील हिंदू स्मशानभूमीजवळ एका बेवारस व्यक्तीचा मृतदेह आढळुन आला.याची माहिती नेहमी जनसामान्यासाठी तत्पर असणारे माजी नगरसेवक प्रसन्ना पळसकर यांनी श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली.माहिती मिळताच त्यांनी 108 लोकेशन वर माहिती कळवीली त्यांनी त्या मृतदेहाला कारंजा उपजिल्हा रुग्णालयाचे दाखल येथे दाखल केले.परंतु त्या मृतदेहाची ओळख न पटल्याने ही माहिती शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांना देण्यात आली.त्यावेळी त्यांनी एपीआय प्रशांत अर्जुन सोबनावळ, पो. कॉ. सुधीर सोळंके ,नरेंद्र खाडे यांनी घटनास्थळी जाऊन त्या मृतदेहाचा पंचनामा केला. तेथील वैद्यकीय अधिकारी चव्हाण सर यांनी त्यावेळी पोस्टमार्टम केले व त्यां मृतदेहाला फ्रीजर मध्ये ठेवण्यात आले.तीन दिवस उलटून सुद्धा कोणताही सुगावा लागत नसल्याने आणि त्याची ओळख पटु न शकल्यामुळे शेवटी शहर पोलीस स्टेशन कारंजा व श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख व कारंजा नगर परिषद ची कर्मचारी यांनी पुढाकार घेत त्या बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.आणि माणुसकीचे दर्शन घडवले.त्यावेळी कारंजा शहर पृथ्वीचे एपीआय प्रशांत सोबनावळ, पो कॉ सुधीर सोळंके , पो कॉ नरेंद्र खाडे , होमगार्ड मेहबूब शेख , पोलीस मित्र महबूब शेख , पोलीस मित्र अफस खान , नगरपरिषद कर्मचारी मोती सांगेल , विजय खंडारे , अशोक चक्रे ,महाराज शिंदे महाराज त्यांनी त्या बेवारस मृतदेहाचा त्याचा अंत्यसंस्कार करून माणुसकीचे दर्शन घडवीले.