नागभीड--- नागभीड येथील शितल वामनराव कोसे यांनी UGC NET ही परीक्षा ऊत्तीर्ण केली आहे. नागभीड येथील वामनराव कोसे यांची मुलगी शितल कोसे ह्यांनी प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय पात्रता परीक्षा (UGC NET) मराठी विषय घेऊन उत्तीर्ण केली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे 28 जूनला महाराष्ट्र शासनाच्या SET परीक्षेचा निकाल लागला होता. त्यातसुद्धा समाजशास्त्र विषयात परीक्षा देऊन त्यांनी यश संपादन केले होते. दोन वेगवेगळ्या विषयात लागोपाठ परीक्षा देऊन दोन्ही परीक्षेत उत्तम गुण मिळवून यश प्राप्त केल्या बद्दल त्यांचे कौतुक होत आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्रा. डॉ. मोहन जगनाडे , प्रा. डॉ. अशोक सालोटकर व आपल्या कुटुंबाला दिले आहे. सध्या त्या नितांशु महाविद्यालय, नागभीड येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांचे Ph. D. सुरु आहे. परिक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल नागभिड येथील आत्य परिवार त्यांचे अभिनंदन करित आहेत,