कारंजा (लाड) : संपूर्ण कारंजा पंचक्रोशीत शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणार्या नामांकित अशा, संस्थापक , माजी मंत्री तथा विकासमहर्षी स्व. बाबासाहेब धाबेकर यांनी स्थापन केलेल्या,
श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय कारंजाचे प्रजासत्ताक दिना निमित्त होणारे ध्वजारोहण यंदा,गुरुवार दि.२६ जानेवारी २०२३ रोजी,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग समाजसेवक तथा साप्ता.करंजमहात्म्यचे संपादक संजय मधुकर कडोळे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे, कलावंतांच्या न्याय हक्कांसाठी झटणारे तसेच करंजमहात्म्यसारख्या साप्ताहिकांमधून आपल्या लेखणीने समाजमनावर छाप पाडणारे संजय कडोळे सर्वश्रुत असे व्यक्तिमत्व आहे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असून सुद्धा या परिस्थितीमध्ये ते सतत समाजभिमुख काम करताना दिसतात. अपघाताने आलेल्या दिव्यांगत्वावर मात करीत त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक सेवेचे व्रत अंगीकारले आहे. त्यांना या कार्याकरिता विविध राज्यस्तरीय पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहे. कष्टकरी दिव्यांगांच्या हस्ते श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयाचे ध्वजारोहण करण्याची अभिनव परंपरा आहे. स्वर्गीय बाबासाहेब धाबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी ही परंपरा सुरू केली होती. येत्या गुरुवार दि. २६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त होणारे ध्वजारोहण दिव्यांग समाजसेवक तथा पत्रकार संजय मधुकर कडोळे यांच्या हस्ते करण्याचा निर्णय संस्थेचे अध्यक्ष सुनील पाटील धाबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. सुभाष गवई घेतला असून यावर्षीही ही अभिनव कल्पना पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. दिव्यांग समाजसेवक तथा पत्रकार संजय कडोळे यांना महाविद्यालयाकडून मंगळवार दि. २४ जानेवारी रोजी त्यांच्या निवासस्थानी जाऊन रितसर निमंत्रण देण्यात आलेले आहे. २६ जानेवारी रोजी होणार्या
ध्वजारोहण कार्यक्रमास महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, कारंजातील प्रतिष्ठित नागरिक, प्राचार्य तथा प्राध्यापक वृंद आणि बहुसंख्येने विद्यार्थी सहभागी होणार आहेत.असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयाकडून कळविण्यात आले आहे.