बाेडधा- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने ३१ मे राेजी राज्यातील ग्रामपंचायत स्तरावर विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी हाेळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा उपक्रम यावर्षीपासून करण्यात आला आहे.
त्यासाठी शासनाच्या परिपत्रकानुसार विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांकडून पुरस्काराकरीता अर्ज मागविण्यात आले हाेते व त्यातून निवड करून राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला हाेता.यामध्ये बाेडधा ग्रामपंचायत तर्फे गावात आराेग्य क्षेत्रात याेगदान देणा-या दुर्गा सचिन बदन व तेजस्विनी घनश्याम खाेब्रागडे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी हाेळकर महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.याप्रसंगी सरपंच मनिषाताई झाेडगे,प्रकाश ताेंडरे ग्रामसेवक,शेवंता खाेब्रागडे अंगणवाडी सेविका,अरूण ठाकरे राेजगार सेवक,मंगेश बांबाेळे ग्रा.पं.सदस्य,सचिन बदन पत्रकार,मंगेश लाेळे आदी मान्यवर उपस्थित हाेते