कारंजा (लाड) : मुंबई मायानगरी एवढीच प्रभावी कारंजा नगरी कलावंताची खाण आणि कदरदान असून चित्रपट सृष्टीतील कोणताही कलावंत निघून गेल्यास ह्या कारंजा नगरीत दुखवटा व्यक्त केल्या जातो. त्यामुळे गानकोकीळा स्व.लता मंगेशकर यांचे निधनानंतर कोरोना महामारीचे सावट असतांनाही आझाद हिंद व्यायाम शाळेच्या मैदानावर हजारो रसिक प्रेक्षकांच्या साक्षीने तत्कालिन स्थानिक उपविभागीय अधिकारी जाधव सर,तहसिलदार धिरज मांजरे आणि शहर पोलिस निरिक्षक आधारसिह सोनोने यांचे उपस्थितीत जाहीर रित्या सामुहिक मूक श्रध्दांजली कार्यक्रम आयोजीत केलेला होता.त्याच पद्धतीने दि.५ जून रोजी सतत पाच दशके प्रेक्षकांच्या हृदयावर आईची सत्ता गाजविणाऱ्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री पद्मश्री स्व.सुलोचनादिदी लाटकर यांच्या निधनाबद्दल स्थानिक कलावंतानी एकत्र येत श्री मरीमाता संस्थान सभागृह बस स्टॅन्ड जवळ कारंजा येथे जागरूक व संवेदनशिल कलावंतानी ग्रामिण पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक गजानन कदम यांचे उपस्थितीत श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला होता.

ज्येष्ठ कलावंत रामबकस डेंडूळे यांच्या संकल्पनेतून आयोजीत श्रद्धांजली कार्यक्रमाला कलाकाराच्या सर्वच संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आदर्श जयभारत सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर गरड यांनी केले.कार्यक्रमाला विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे,अँड संदेश जिंतुरकर,अ भा मराठी नाट्य परिषदेचे नंदकिशोर कव्हळकर, रामबकस डेंडूळे,भजन सम्राट डावरे यांची उपस्थिती होती. यावेळी सर्वप्रथम दिपप्रज्वलन व पद्मश्री स्व.सुलोचनादिदिच्या प्रतिमेचे पूजन,हारार्पण व सामुहिक मौन श्रद्धांजली घेण्यात आली.त्यानंतर डॉ . इम्तियाज लुलानिया,नंदकिशोर कव्हळ्कर यांनी सुलोचनादिदी यांच्या चित्रपट आठवणींना उजाळा दिला.यावेळी संजय कडाळे यांनी आपल्या मनोगतातून बोलतांना सांगीतले. "स्थानिक कारंजा नगरीने प्रेक्षकांना राघू मैना,डॉली,दिलसे दूर,जय हो स्वच्छ भारत अभियान सारखे चित्रपट दिलेले दिलेले आहेत.येथील महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त कलावंत शिवमंगलआप्पा राऊत यांनी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला सारख्या चित्रपटात भूमिका केल्या आहेत.येथील आय के परमार,रोमिल लाठीया, डॉ.इम्तियाज लुलानिया सारख्या कलावंतानी स्थापन केलेल्या ईरो फिल्मस एन्टरटेन्टमेन्ट ने चित्रपट क्षेत्रात समाधानकारक प्रगती करीत जय हो स्वच्छ भारत अभियानला शासनाचा पुरस्कार मिळवून दिलेला आहे.येथील राहूल सावंत या कलावंताचे राष्ट्रिय कार्यक्रम आणि नृत्यकलेच्या विकासात फार मोठे योगदान आहे.स्थानिक कारंजा शहरातील चित्रपट अभिनेते शिवमंगल आप्पा राऊत,गायक कलावंत रामबकस डेंडूळे, राष्ट्रपिता महात्मा गांधी व इतरही भूमिका यशस्वी वठविणारे हरहुन्नरी कलावंत प्रकाश गवळीकर व साहित्यीक,लोककलावंत,दिव्यांग समाजसेवक आणि ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे या कारंजा नगरीतील चार कलावंताना महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारांनी अलंकृत करण्यात आलेले आहे. येथील बहुजन समाजाचे विश्वासू व्यक्तिमत्व अ भा मराठी नाट्य परिषद मुंबई या संस्थेत उत्कृष्ट नेतृत्व करीत आहे.

डॉ ज्ञानेश्वर गरड यांच्या सारखे कलावंत स्वतः आदर्श भूमिका वठवीत त्यांनी आजपर्यंत अकराशे उपवर वरवधूचे सामुहिक विवाह घडवून आणलेले आहेत.येथील विदर्भ लोककलावंत संघटना,आदर्श जय भारत सेवाभावी संस्था, जिव्हाळा परिवार,गुरुदेव सेवा मंडळ, अविष्कार बहु संस्था,अ भा मराठी नाट्य परिषद शाखा इत्यादी संस्था कारंजेकर नागरीका मधून नवनविन कलावंत तयार व्हावे.त्यांना कलेकरिता प्रोत्साहन मिळावे व त्यांना शासनाकडून त्यांचे न्याय्यहक्क मिळावेत ह्यासाठी कार्यरत आहेत.अशा सर्वच संस्था कलाकारा प्रती जागरूक असल्यामुळे,आपल्या मधून निघून गेलेल्या आदर्श कलावंत पद्मश्री स्व.सुलोचनादिदी यांना श्रद्धांजली देणे आमचे कर्तव्य ठरत असून कारंजेकर कलावंत ज्येष्ठ कलावंताचा आदर्श ठेवून प्रेरणा घेणारे आहेत. तसेच दि ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरणदिन आहे. याची जाण ठेवून डॉ. ज्ञानेश्वर गरड, राहुल सावंत, नंदकिशोर कव्हळकर, पत्रकार विजय खंडार,गोपिनाथ डेंडूळे, उमेश अनासाने यांनी प्राणवायू करीता पर्यावरणाचा समतोल राखणे जरूरी असल्यामुळे येत्या पावसाळ्यात वड,पिंपळ ,औदंबर,शिसम , आंबा,बाभूळ सारखी आरोग्यदायी वृक्षांचे रोपण करण्याचा सल्ला दिला. नव्याने कारंजा नगरीतील ग्रामिण पोलिस स्टेशनला पोलिस उपनिरिक्षक गजानन कदम हे रुजू झाले आणि योगा योगाने त्यांचा वाढदिवस दि ५ जून रोजी असल्यामुळे आदर्श जय भारत संस्थेकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाला बहुसंख्य लोकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे आभार राहुल सावंत यांनी मानले. असे वृत्त रोमिल लाठीया यांनी कळविले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....