वरोरा :- वरोरा शहरातील मालवीय वार्ड येथील रहिवाशी मोहम्मद जहांगीर अशरफी वल्द अब्दुल मजीद या मौलवी ने आपल्या घरातील मौल्यवान सामान चोरून नेल्याची तक्रार दि. 26 डिसेंबर 2024 ला पोलीस स्टेशन गाठून दिली. या वरून पोलिसांनी रमजान खान पठाण, अमजद सरदार पठाण, इकबाल हबीब शेख, इजहार इद्रिस शेख, अन्सार हुसेन शेख, रजा आलम सय्यद, खलीप शब्बीर शेख, मोबीन आसिफ शेख, शब्बीर हसन शेख, सलील सरदार पठाण, इमामुद्दिन अलाउद्दीन सर्व मालवीय वॉर्ड राहणार यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 चे 329, 331 ( 1 ),305, 340, 3 ( 5 ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
डिसेंबर 2004 मध्ये मालवीय वार्ड येथे चावरे यांच्या घरी राहत असणाऱ्या मौलवी शेख मोहम्मद जहांगीर अशरफी वल्द अब्दुल मजीद शेख यांनी मालवीय वार्ड येथील गरीब मुलांना मिळेल तिथे जागा घेऊन धार्मिक शिक्षण सुरू केले. जागेच्या संदर्भात जैनुद्दीन शेख यांना आपली अडचण सांगितली असता जॉन रिजवी यांच्यासोबत ओळख करून दिली. त्यानंतर मालवीय वार्डातील उद्धव रघुनाथ बुरटकर यांच्या कडे इमल्याची खरेदी पत्र करून देण्यात आले. त्या जागेत 2010 मध्ये मस्जिदीचे काम पूर्ण झाले. त्या मस्जिदला लागून चार रुमाही बांधण्यात आल्या त्यात हे मौलवी राहत होते. या मस्जिदतीचे रजिस्ट्रेशन सण 2010 मध्ये बंडू लभाने यांच्या सहकार्याने करण्यात आले. या मस्जिदतीत राहून मुलांना शिक्षण देण्यात आले. सण 2022 मध्ये मस्जिद समोर राहणारे सचिव रमजान शहबाज खा पठाण या पावत्या छापून गुलशन मदिना बहुउद्देशीय संस्थेच्या नावाने चंदा गोळा करीत होते. या संदर्भात धर्मदाय आयुक्त यांना हिशोब द्यावा लागतो म्हणून सांगितल्यावर सदर सचिवाने तू तुझे काम कर असे बोलले दि. 19 डिसेंबर 2024 ला भागलपूर ( बिहार ) येथे आपल्या मूळ गावी मुलीच्या विवाह करिता गेले असता. जॉन रिजवी यांनी तुमच्या घराच्या मागच्या दाराचे व समोरच्या दाराचे कुलूप तोडून सामानाची अपरातपरी केली त्याचे सांगितले . दि. 23 डिसेंबर 2024 ला मस्जिदीच्या रूम मधील सामानाची पाहणी केली असता माझ्या घरातील दोन सिलेंडर मस्जिदीतील दोन दान पेट्या मागील पाच ते सहा महिन्यापासून जमा होणारी अंदाजी रक्कम 50 हजार असे मिळून चोरून नेल्याचे दिसून आले. दिनांक 26 डिसेंबर 2024 ला वरोरा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलीस अधिकाऱ्यांनी 17 डिसेंबर 2024 रोजी गुलशन मदिना बहुउद्देशीय संस्था मालवीय वार्ड वरोरा संस्थेच्या लेटर पॅडवर रमजान खान पठाण, अमजद सरदार पठाण, इकबाल हबीब शेख, इजहार इद्रिस शेख, अन्सार हुसेन शेख, रजा आलम सय्यद, खलीप शब्बीर शेख, मोबीन आसिफ शेख, शब्बीर हसन शेख, सलील सरदार पठाण, इमामुद्दिन अलाउद्दीन यांनी गुलशन मदिना बहुउद्देशीय संस्थेचे बनावट लेटर पॅड बनवून माझ्या घरातील 56000 चा मुद्देमाल चोरून नेला . यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेले नाही. पुढील तपास एपीआय अनिल मेश्राम करीत आहे.