जय हनुमान बहुउदयशीय संस्था अकोला व गुड मॉर्निंग ग्रुप च्या वतीने मेळघाटतील रायपूर व पिंपळवाड येथील ग्रामीण भागातील नागरिक व रोड बांधकाम मजुरांना आवश्यक कापडंlचे ज्यामध्ये महिंलासाठी साड्या, टॉवेल, युवकांसाठी टी शर्ट, पॅन्ट शर्ट, जेष्ठासाठी ब्लॅंकेट टोपी दुपट्टे तसेच बालकांसाठी खाऊचे वितरण करण्यात आले यावेळी संस्था अध्यक्ष आपला माणूस डॉ अशोक ओळंबे यांनी कामगार,शेतकरी,शेतमजूर यांच्यासाठी असलेल्या केंद्र व राज्य शासनांच्या विविध योजनांची माहिती देऊन शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आव्हान उपस्थित नागरिकांना केले तसेच संस्था नेहमीच सामाजिक दायित्व समजून आरोग्य शिबीरे, नेत्र शस्त्रक्रिया शिबीरे,आरोग्य सुविधा,रक्तदान शिबीरे राबवून सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असल्याचे सांगितले,कार्यक्रमाच्या शेवटी गावातील ग्रामस्थांनी संस्था पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून आभार मानले.कार्यक्रमाला जेष्ठ मार्गदर्शक दिनकरराव घोडेराव, कोष्याध्यक्ष अड संतोष गोळे, पक्षीमित्र गजानन गोलाईत,सामाजिक कार्यकर्ते अरुण मानकर, संतोष काटे यांचेसह जय हनुमान बहुउदयशीय संस्था अकोला व गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.