महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या पत्रानुसार "हर घर तिरंगा" या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी हितकारिणी माध्य. तथा उच्च माध्य. विद्यालय आरमोरीच्या वतीने शाळेच्या परिसरात वघाळा बर्डी या ठिकाणी रॅली काढण्यात आली.
वर्ग 11व 12 (शाखा -कला, वाणिज्य व विज्ञान )विद्यार्थ्यांनी रॅलीत "एकच अमुचा नारा हर घर तिरंगा प्यारा " या घोषनेत वघाळा बर्डी येथे रॅली काढण्यात आली.
वरील रॅलीला प्राचार्य फुलझेले सर यांच्या मार्गदर्शनात पर्यवेक्षक बहेकर सर, प्रा. प्रधान, प्रा. दोनाडकर, प्रा. राखाडे, प्रा. मश्याखेत्री, प्रा. नैताम, प्रा. सहारे, प्रा. सेलोकर, प्रा. कु. शेंडे, प्रा. कु. मेश्राम, प्रा. कु. साळवे उपस्थित होते.