कारंजा :- विनोदराव सोनोने(पोलीस उपनिरीक्षक) यांची नुकतीच शासकीय सेवेतून निवृत्ती झाली असून त्यांच्यावर समाजातील अनेक संस्था व विविध राजकीय पक्षाकडून शुभेच्छा व सत्काराचा अगदी वर्षावच होतो आहे आणि याची दखल घेऊन नवनिर्माण फाउंडेशनचे अध्यक्ष अनुपभाऊ ठाकरे, अर्चना अनुप ठाकरे व इतर संचालक मंडळ प्रमोद गावंडे, प्रमोद रोकडे, अनिलजी काटोले, विनोद बांडे व पुंडलिक लसनकुटे, प्रिंस ठाकरे इत्यादी पदाधिकारी यांनी सत्कार मूर्ती श्री विनोदभाऊ सोनोने यांचे राहते घरी भेट देऊन त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित अभिनंदन केले.
विनोद सोनोने यांनी आपल्या दीर्घ शासकीय सेवेतून निःस्वार्थपणे समाजसेवा साधली असुन त्यांनी आपण पोलीस खात्यात असल्याचा अभिमान कधीही बाळगला नाही. गरजुच्या मदतीस नेहमीच धावून जाण्याची त्यांची ख्याती असून ते आजही गरजुच्या मदतीस तात्काळ धावून जातात. म्हणजेच आपले कर्तव्य बजावत असताना आपण समाजाचे सुद्धा ऋणी राहतो याचे नेहमीच भान ठेऊन त्यांनी आपली नोकरीं केलेली आहे.आपली नोकरीं सांभाळत असताना त्यांनी समाज कार्यास सुद्धा नेहमीच प्राधान्य दिलेले दिसून येते. गरजूची त्यांनी नेहमीच मदत केली असून सेवेदरम्यान त्यांची नाळ ही समाजकार्याशी सदैव जुळवून राहिल्याचे दिसून येते.तरी त्यांची आपले कर्तव्य बजावत असताना जि जिद्द, चिकाटी व सामाजिक भावना दिसून यायची तीच तळमळ भविष्यात सुद्धा कायम राहील व ते आपले पुढील आयुष्य सुद्धा समाजकार्यत व सत्कारणी लावतील अशी अपेक्षा असल्याचे मौलिक विचार श्री. अनुप ठाकरे यांनी आपल्या विचारातून मांडले.
तसेच यावेळी अनुप ठाकरे व सत्कारमूर्ती श्री विनोद सोनोने यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले व नवनिर्माण फाउंडेशनचे संचालक व शिवनेरी फायनान्स सर्व्हिसेसचे संचालक श्री.पुंडलिक लसनकुटे यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त करताना श्री विनोद सोनोने यांचे सोबतचे मैत्री व स्नेहाचे अनेक प्रसंग उजागर करून जुन्या आठवणींना पुन्हा एक झळाळी दिली यावेळी इतर पदाधिकारी व संचालक मंडळी सुद्धा मंत्रमुग्ध झालेली दिसून आली. तसेच नवनिर्माण फाऊंडेशनचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सुद्धा भ्रमणध्वनी व्दारे श्री विनोद सोनोने यांना संपर्क साधून त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी नवनिर्माण फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री अनुप ठाकरे यांनी सहपरिवार सोनोने दाम्पत्त्यास भेट देऊन त्यांचा सापत्नीक यथोचित सत्कार केला.