वाशिम :
ई - मोजणी व्हर्जन २ या प्रणालीच्या माध्यमातून आता शेतक-यांना घर बसल्या त्यांचे लॉगीन आयडीवर मोजणी नकाशाची प्रत प्राप्त होणार आहे. शेतक-यांना मोजणी नकाशाची प्रत घेण्याकरीता आता उपअधीक्षक
भूमि अभिलेख, कार्यालयात येण्याची गरज नाही. यामुळे शेतकरी बांधवांचा अमूल्य वेळेची बचत होणार आहे.
यामध्ये अर्जदार ज्यावेळी प्रथमतः ई-मोजणी व्हर्जन २.० या प्रणालीत मोजणीसाठी अर्ज करत
असतील तर त्यांना प्रथमतः लॉगिन आयडी तयार करणे बंधनकारक आहे. लॉगिन आयडी तयार झाल्यानंतर अर्जदारांनी नियमानुसार मोजणीसाठी लागणारी आवश्यक ती माहिती लॉगिन आयडीवर
भरणे आवश्यक आहे. मोजणी अर्ज हा लॉगीन आयडीवरुन भरल्यानंतर संबंधित मोजणी अर्जावर कार्यालयाकडून
काय कार्यवाही झाली हे कळेल. अर्जदारांनी अर्ज अचूक भरल्यानंतर मोजणीचा अर्ज सबंधित
कार्यालयाकडून स्विकारल्या जाईल. यासाठी अर्जदार यांना लॉगिन आयडीद्वारे अर्ज भरतांना अचूक माहिती भरणे आवश्यक आहे. या प्रमाणे अचूक व परिपूर्ण मोजणी अर्ज संबंधित कार्यालयाने ऑनलाईन स्वीकृत केल्यानंतर, ई-मोजणी व्हर्जन २.० प्रणाली मधील ऑनलाईन शेड्यूलर रन होऊन, सॉफ्टवेअरव्दारे त्या मोजणी अर्जास मोजणी दिनांक देण्यात येईल व त्याबाबतचे प्रत्येक अपडेट अर्जदार यांचे लॉगिन आयडीवर दिसेल. तसेच नियोजीत मोजणी
तारीखचा मेसेज व मोजणी कर्मचारी यांचे नाव अर्जदार यांचे लॉगीन आयडीवर व मोबाईल नंबर वर जाईल.
तदनंतर मोजणीची कार्यवाही पुर्ण झाल्यास भूमापकाकडून सदर जागेचे सर्व्हे नंबर / गट नंबरचे अक्षांश रेखांश हे व्हर्जन २.० प्रणाली मध्ये भरल्यानंतर सदर जागेचा मोजणी नकाशा हा ऑनलाईन स्वरुपात तयार
डिजिटल स्वाक्षरीने अर्जदाराच्या लॉगीन आयडीवर पाठविला
जाईल. त्यानंतर अर्जदारांना युजर आयडीचा वापर करुन मोजणी नकाशाची प्रत म्हणजेच क प्रत
डिजिटल स्वरुपात डाऊनलोड करुन घेता येईल. असे भूमी अभिलेखच्या जिल्हा अधीक्षक भारती खंडेलवाल यांनी कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....