तालुक्यात सर्वत्र मुसळधार पावसामुळे नदी,धबधबा, धरणे ओसंडून वाहत आहे, या निसर्गरम्य हार्दिक विनायक गूळघाने वय 19 रा. शेगाव आयुष चीडे, वय 19 रा. वरोरा असे दोघा मित्राचे नावे आहेत
श्वेतम चंद्रकुमार जयस्वाल वय 19 रा. शेगाव,मयूर विजय पारखी वय 20 रा.वरोरा, आश्रय संजू गोळगोंडे वय 19 रा.वरोरा हार्दिक गुळघाणे,आयुष चिडे हे चारगाव बू येथील तलाव जवळ फिरायला आले होते.
हार्दिक गुळघाने हा तलाव जवळ फोटो काढायला गेला असता त्याचा पाय घसरून तो तलावात पडला. हार्दिक ला वाचवायला आयुष चिडे गेला असता तो पण तलावात बुडाला. बाकी मित्रांनी आरडाओरड करून स्थानिक नागरिकांना बोलविले परंतु खूप उशीर झाल्याने हार्दिक आणि आयुष यांची शरीर खोल धरणाच्या पाण्याच्या आत गेली त्यामुळे . स्थानिक लोकांच्या मदतीने बुढलेल्ल्या हार्दिक आणि आयुष यांचा शोध पोलीस अधिकारी ए पी आय मेश्राम, सरोदे ,मदन येरने घेत आहे
पोलीस घटनास्थळी हजर आहे दोन तासांच्या अथक परिश्रमा नंतर लागला मृतदेहाचा शोध पावणे तीन वाजता घडलेल्या घटनेनंतर पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाली ,पोलिसांनी कोळी बांधव व स्थानीक नागरिकांच्या मदतीने या बालकाचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली, दोन तासांच्या अथक परिश्रमा नंतर पोलिसांना कोळी बांधवांच्या मदतीने मृतदेह धरणाच्या बाहेर काढण्यात यश आले मृतदेहाला शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले असून या बालकांच्या मृत्यू मुळे रुग्णालयात एकच गर्दी उसळली होती,