राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूरच्या वतीने ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासाठी दिनांक 7 डिसेंबर पासून अन्नत्याग उपोषण सुरू झाले. अन्नत्याग आंदोलनाला पाठींबा देत दिनांक 8 डिसेंबर पासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली. साखळी उपोषणाला भरपूर पाठिंबा मिळत असल्याने आज तिसऱ्या दिवशी तहसील कार्यालय समोर थाळी बजाव आंदोलन करण्यात आल्याने आंदोलन तीव्र होण्याच्या मार्गावर आहे.
7 डिसेंबर 2023 पासून चिमूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू झाले असून शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलक अजित सूकारे व अक्षय लांजेवार यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी श्रीहरी सातपुते. अविनाश अगडे. पप्पू शेख. अमोल जूनघरे यांनी साखळी उपोषण सुरू केले. अन्न त्याग आंदोलनाचा तिसरा दिवशी तहसील कार्यालय समोर थाळी वाजउन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले.
यावेळी यामिनी कामडी. दुर्गा निवटे. विजया तरारे. सुनीता सहारे. कपिला चावरे. सुनीता मुरकुठे. रेखा चाचारकर. मंदा रंधये पुज्या नन्नावरे. शेकडो ओबीसी महिला पुरुष व विवीध संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.