कारंजा : "पत्रकार" म्हणजे "लोकशाहीचा चौथा स्तंभ" आणि "समाजाचा महत्वाचा दुवा" म्हणून ओळखला जातो.त्यामुळे सामाजिक,राष्ट्रीय सणाला पत्रकारांची आठवण असायला हवी.मागील वर्षी कारंजा शहर पोलीस स्टेशन कारंजाचे तत्कालिन पोलीस निरिक्षक आधारसिह सोनोने सर यांनी दिवाळी निमित्ताने,पत्रकारांचे दिवाळी स्नेहसंमेलन घेऊन प्रत्येक पत्रकारांना,दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मागील वर्षी ते कारंजा येथे कार्यरत होते.आज दिपावलीच्या पूर्व दिनी,दिपावली निमित्ताने त्यांच्या कर्तव्यदक्ष व मनमिळाऊ व्यक्तिमत्वाची आणि त्यांनी पत्रकारांना दिलेल्या सन्मानाची प्रकर्षाने आठवण झाली.असे मत महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी व्यक्त केले आहे.तसेच दिपावली व नुतनवर्षानिमित्त,सर्व लोकप्रतिनिधी, सर्व कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी,कामगार, व्यापारी,शेतकरी,कष्टकरी, पत्रकार बांधव व कारंजेकर नागरीकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.