वाशिम /कारंजा : अमरावती विभागीय शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष तथा अमरावती विधान परिषद मतदार संघाचे सदस्य (शिक्षक आमदार) एड किरणरावजी सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त, सोमवारी दि. २० संप्टेंबर रोजी,वाशिम येथील कार्यालयात, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माजी प्राचार्य प्रा दादासाहेब लाव्हरे यांच्या अध्यक्षतेखाली, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदे कडून घेण्यात आलेल्या कार्यक्रमात, जिल्हाध्यक्ष संजय कडोळे आणि माजी सरपंच तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रदिपभाई वानखडे यांनी लाडके आमदार अॅड किरणराव सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार केला. व भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या .याप्रसंगी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त असलेले मराठा सेवा संघ प्रणित संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष हभप श्रीकृष्ण महाराज राऊत पाटील, व्यसनमुक्ती सम्राट हभप लोमेश पाटील चौधरी इ उपस्थित होते.