कारंजा (लाड) दि.25.11.20.23.रोजी पुन्हा गरजू रुग्न जयवंतबाई किसनराव सावळे, मुळ राहणार माणकोपरा. ता.दारव्हा जि. यवतमाळ यांना रक्ताची अत्यंत आवश्यकता असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याकडून त्वरित रक्त उपलब्ध करून दिले यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.भाऊसाहेब लहाने उपस्थित होते.व दिलीपभाऊ रोकडे नरेंद्र भोयर विष्णू गुडदे.या कार्यकर्त्यांचे स्तुत्य कार्य पाहून उपस्थित आणि व रुग्णाच्या नातेवाईकांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले या पुढेही एखाद्या गोरगरीब गरजूंना रक्ताची आवश्यकता असल्यास वंचित बहुजन आघाडी कारंजा लाड जिल्हा वाशिमच्या कार्यकर्त्यांना त्वरित संपर्क करावा.असे आव्हान वंचित बहुजन आघाडी कारंजा शहर च्या वतीने केले आहे. तसेच भविष्यात गरज पडल्यास नियमीत गरजू रुग्नांकरीता रक्तदान करण्याकरीता वंचित बहुजन आघाडीचे सामाजिक कार्यकार्ते तयार असून गरजवंत रुग्नानी संपर्क क्रमांक फो.नं.9673290115 वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे .