कारंजा :- वाशिम जिल्ह्यामध्ये 27व 28 नोव्हेंबर 2023रोजी झालेल्या अवकाळी पावसासह गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करून त्यांना तातडीने मदत देणे बाबत कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री .राजेंद्र पाटणी साहेब यांनी राज्याचे मदत पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा . ना.श्री अनिल भाईदास पाटील साहेब महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी दखल घेत जिल्हाधिकारी वाशिम यांना त्वरित कारवाई करून अहवाल सादर करण्यास करावा असे निर्देश दिले.
कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री राजेंद्र पाटणी साहेब यांनी राज्याचे मदत पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री माननीय नामदार श्री अनिल भाईदास पाटील यांना पत्र देऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानासंदर्भात सविस्तर माहिती देऊन सांगितले की या संदर्भातील प्राथमिक अहवाल तहसील स्तरावरील मागविला असता जिल्हयातील कोणत्याही तालुक्यात पिकांचे नुकसान झाले नसल्याचे नमूद आहे. या अहवालावरून जिल्हास्तरावरून विभागीय स्तरावर पाठविलेल्या प्राथमिक अहवालात पिक नुकसान निरंक दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता मावळली आहे. त्यांची परिस्थिती पाहता त्यांना मदत देणे नितांत आवश्यकतेचे आहे . आपली मागणी पुढे रेटतानी त्यांनी सांगितले की, मदत पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांनी महाराष्ट्र शासनास व जिल्हा प्रशासनास शेतकऱ्यास मदत देण्याबाबत आदेश निर्गमित करावे.
कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी जिल्ह्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेतकऱ्यांच्या पिकांची परिस्थिती विशद करताना सांगितले की, वाशिम जिल्ह्यामध्ये दिनांक 27 व 28 नोव्हेंबर 2023 रोजी अवकाळी पावसासह गारपीट झाली यात खरीप हंगामातील शेंगा, फुला वरची तुर अक्षरशः झोपली तर फुटलेली शेकडो हेक्टर मधील कपासीही भिजून पडली शिवाय रब्बी हंगामातील पिकांसह भाजीपाला पिकांनाही या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले तथापि प्रशासनाच्या प्राथमिक अहवालात मात्र पिकांचे नुकसान निरंक दाखविण्यात आले आहे.
जिल्ह्यात 26 नोव्हेंबर च्या उत्तर रात्रीपासून 27नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली तर दिनांक 28 नोव्हेंबर रोजी ही सकाळी 3 वाजता पासून सकाळी 7 वाजेपर्यंत जिल्हाभरात जोरदार अवकाळी पाऊस झाला. सोमवारी सकाळपर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे 465 हेक्टर मध्ये पिकांचे नुकसान झाल्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली होती दरम्यान 90 मेंढ्यांचाही मृत्यू झाला.
अशी संपूर्ण परिस्थिती मंत्री महोदय यांच्याकडे मांडत जिल्ह्यातील स्थिती सांगून जिल्हयातील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याची मागणी केली असता मंत्री मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांनी जिल्हाधिकारी वाशिम यांना त्वरीत कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे सांगितले आहे. विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी दिलेल्या पत्रावर असे निर्देश नमूद आहेत. असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्वीय सहाय्यक यांनी कळविले.